Home /News /viral /

अंगावर काटा आणणारा VIDEO: स्टंट करताना बायकर घसरले आणि..

अंगावर काटा आणणारा VIDEO: स्टंट करताना बायकर घसरले आणि..

Bike Stunt Accident Video: बाईकवर स्टंट करण्याचं वेड तरुणांमध्ये कायमच दिसतं. पण हा व्हिडिओ स्टंटचं वेड घालवणारा आहे.

    मुंबई, 10 मार्च : सोशल मीडियावर अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी अपघाताचे व्हिडिओज असतात, कधी बालंबाल बचावलेल्या एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ असतो तर कधी एखाद्या स्टंटचा. (IPS Officer Dipanshu Kabra) ताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. दोन मुलांचा हा व्हिडिओ आहे. ही दोन मुलं यात स्टंट करताना दिसत आहेत. (2 young men bike stunt video) वेगात जाणाऱ्या बाईकवर ही दोन मुलं स्टंट करताना दिसत आहेत. मात्र स्टंट करताना त्यांच्यासोबत जे झालं ते पाहून कुणीही यापुढं स्टंट करण्याचा विचारच सोडून देईल. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. हेही वाचा VIRAL VIDEO: बघिराने केली कुत्र्याची शिकार; ब्लॅक पँथरचा थरार CCTV मध्ये कैद कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा, अशा वेडेपणात तिला गमावू नका.' (IPS Officer Dipanshu Kabra viral video) या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की दोन मुलं कशी खूप वेगात बाईकवर स्टंट करत आहेत. एक मुलगा बाईक चालवतो आहे आणि दुसरा बाईकवर आपले हात हवेत पसरून मागे उभा आहे. बाईक काही अंतर दूर गेल्यावर मागच्या मुलाचा पाय घसरतो. हेही वाचा VIRAL VIDEO: बघिराने केली कुत्र्याची शिकार; ब्लॅक पँथरचा थरार CCTV मध्ये कैद तो चालत्या बाईकवरून वाईट पद्धतीनं खाली पडतो. बाईक पुढे जाते तसं दुसरा मुलगाही बाईक घेऊन वाईट पद्धतीनं रस्त्याच्या कडेला जाऊन पडतो. (young men fall down in stunt viral video) व्हिडिओ पाहून हेच वाटतं आहे, की दोघांनाही चांगलंच लागलं आहे. हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला 10 हजारहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. कमेंट्समध्ये लोक असा स्टंट अजिबात न करण्याचे सल्ले देत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike accident, Twitter, Viral video.

    पुढील बातम्या