कमालीचा व्हायरल झालाय हा अनोखा पक्षी, पाहून IPS अधिकारी म्हणाला, मूंछे हो तो...!

कमालीचा व्हायरल झालाय हा अनोखा पक्षी, पाहून IPS अधिकारी म्हणाला, मूंछे हो तो...!

VIRAL Photo of Bird: सोशल मीडियावर प्राणी-पक्षी कायमच हिट असतात. आता व्हायरल झालाय एक अनोखा पक्षी.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (social media) अनेकदा गंमतीदार व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल (videos and photos viral on social media) होत असतात. अनेकदा आपल्याला इंटरनेटवर एकदमच अद्भुत पक्षी-प्राणी पहायला मिळतात. (interesting birds and animals on social media)

यातील काही इतके सुंदर असतात, की त्यांच्यावरून नजर हटवणं अवघड होऊन बसतं. अशातच एका वेगळ्याच पक्ष्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (beautiful bird on social media)

तुम्हा सगळ्यांना अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील एक डायलॉग माहीतच असेल, 'मुंछे हो तो नत्थू लाल जैसी...' आता या पक्ष्याला पाहून अनेकांना हा डायलॉग बदलून लिहावा वाटतो आहे, 'मुंछे हो तो इस पंछी जैसी...' हो, या पक्ष्याच्या मिशा!

हेही वाचा छोट्याशा मैत्रिणीचा बॉल मिळवण्यासाठी कुत्र्यानं केलं असं काही, नेटकरी झाले भावुक

नुकताच आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी एका खूपच अनोख्या पक्ष्याचा फोटो शेअर केला. (IPS officer Dipanshu Kabra shared photo of a bird) हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनही लिहिली, की मुंछे हो तो...' या पक्ष्याचं नाव आहे इंका टर्न. (Inka Tern bird on social media)

लोक सोशल मीडियावर या पक्ष्याचा फोटो पाहून एकदमच आश्चर्यात पडले आहेत. अनेकांना हा पक्षी म्हणजे एक कार्टून कॅरेक्टरच वाटतो आहे. अनेकांना हा ऍनिमेटेड कॅरेक्टर वाटतो आहे. मात्र हा पक्षी एकदम खराखुरा आहे.

हेही वाचा VIDEO भुकेने तडफडत बछड्याने सोडला जीव; पुढे बिबट्याने जे केलं ते पाहून हादराल

डार्क ग्रे रंगाच्या या पक्ष्याची चोच लाल, पाय लाल आणि मिशा पांढऱ्या आहेत. हा पक्षी इतका वेगळा दिसतो, की त्याच्यावरून नजर हटत नाही. याचा अनोखा लुक सगळ्यांनाच आवडतो आहे. इंका टर्न हा पक्षी पेरू आणि चिली देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळतो.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 9:14 PM IST

ताज्या बातम्या