नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : प्राण्यांना हौस म्हणून अनेकजण कपडे घालतात पण ऐन थंडीच्या वेळी जेव्हा हुडहुडी भरते तेव्हा मात्र हे प्राणी थंडीनं व्याकूळ झालेले असतात. उब शोधण्यासाठी भटकत राहतात. काहीवेळा गारठूनही जातात. नुकतंच ऑक्टोबर महिना संपून थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत आहे. माणसांप्रमाणेच देवांनाही शाल आणि उबदार कपडे चढवले जातात पण बऱ्याचदा प्राणी थंडीत कुडकुडत राहतात. या प्राण्यांना देखील उब मिळण्याची गरज आहे हे सांगणारं एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिपांशू काब्रा यांनी हा फोटो शेअर केला आहे. थंडी त्यांनाही वाजते फक्त ते बोलू शकत नाहीत असं कॅप्शन देऊन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बकरीमे स्वेटर घातल्याचं पाहायला मिळत आहे. या मुक्या प्राण्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया असं दिपांशू काब्रा यांनी आवाहन देखील केलं आहे.
ठंड उन्हें भी लगती है जो कह नहीं सकते...
अपने आसपास रहने वाले मूक प्राणियों की खामोशी को समझें और उन्हें ठंड से बचाने का प्रयास करें, हर साल शीतलहर के कारण बड़ी संख्या में पशु,पक्षियों की जान चली जाती है, आपके छोटे से प्रयास से उन्हें ठंड से बचाया जा सकता है..। pic.twitter.com/D14Bfx2vaJ
अपने आसपास रहने वाले मूक प्राणियों की खामोशी को समझें और उन्हें ठंड से बचाने का प्रयास करें, हर साल शीतलहर के कारण बड़ी संख्या में पशु,पक्षियों की जान चली जाती है, आपके छोटे से प्रयास से उन्हें ठंड से बचाया जा सकता है..। pic.twitter.com/D14Bfx2vaJ
दिपांशू काब्रा यांच्या पोस्टला 400 हून अधिक लोकांनी लाईक केलं असून अनेक युझर्सनी नक्की करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासनही दिलं आहे. 5 नोव्हेंबरला ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. मुक्या प्राण्यांना देखील थंडी वाजते आणि त्यांचे हातपाय गारठतात त्यामुळे अशा प्राण्यांसाठी आपल्याकडून होईल ती मदत करण्याचं आवाहन दिपांशू काब्रा यांनी ट्वीटमधून केलं आहे.