Home /News /viral /

10 महिन्यांनी सापडला नदीत पडलेला आयफोन; फोनची अवस्था पाहून सर्वच थक्क

10 महिन्यांनी सापडला नदीत पडलेला आयफोन; फोनची अवस्था पाहून सर्वच थक्क

मोबाइल (Mobile) ही आजच्या जगात अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल पाहायला मिळतो. बऱ्याचदा मोबाइलशी निगडित काही विचित्र घटनांविषयी आपण ऐकतो, वाचतो. यूकेमधली (United Kingdom) एक घटना तर अविश्वसनीय आहे. मोबाइल पाण्यात पडला किंवा भिजला तर तो खराब होण्याची शक्यता असते;

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जून-   मोबाइल (Mobile) ही आजच्या जगात अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल पाहायला मिळतो. बऱ्याचदा मोबाइलशी निगडित काही विचित्र घटनांविषयी आपण ऐकतो, वाचतो. यूकेमधली (United Kingdom) एक घटना तर अविश्वसनीय आहे. मोबाइल पाण्यात पडला किंवा भिजला तर तो खराब होण्याची शक्यता असते; पण यूकेमधल्या या घटनेवर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. सुमारे 10 महिन्यापूर्वी एका व्यक्तीचा मोबाइल नदीत (River) पडला होता. परंतु, संबंधित व्यक्तीला त्याचा मोबाइल अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर परत मिळाला. विशेष म्हणजे, दीर्घ काळ पाण्यात असूनही या व्यक्तीचा मोबाइल चालू स्थितीत अर्थात वर्किंग मोडमध्ये होता. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यूकेमधले ओविन डेव्हिस (Owain Davies) 10 महिन्यांपूर्वी फिरण्यासाठी वाय नदी (Wye River) परिसरात गेले होते. तिथं त्यांचा आयफोन (iPhone) नदीत पडला. नदीचं पात्र खोल असल्यानं आता आयफोन परत मिळणार नाही, असं त्यांना वाटलं; पण जून 2022 च्या सुरुवातीला मगेल पचेको (Miguel Pacheco) त्यांच्या कुटुंबीयांसमवेत वाय नदीच्या परिसरात फिरण्यासाठी आले होते. फेरफटका मारत असताना मगेल यांना ओविन यांचा आयफोन चिखलात सापडला. त्यानंतर मगेल यांनी आयफोन ताब्यात घेतला आणि पूर्णपणे कोरडा केला. मगेल यांनी या आयफोनचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्यास सुरुवात केली. ज्या व्यक्तीचा हा आयफोन आहे, त्याला तो परत मिळावा, असा मगेल यांचा उद्देश होता. (हे वाचा:अंधश्रद्धेचा कळस; चक्क जीभ कापून केली देवीला अर्पण, मंदिरातच तरुणीसोबत घडलं विपरीत ) मगेल पचेको यांनी आयफोनबाबतची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली; मात्र ही माहिती आयफोनचे मूळ मालक ओवेन डेव्हिस यांच्यापर्यंत पोहोचली नाही. सुमारे सहा महिने ते सोशल मीडियापासून दूर होते. त्यामुळे या पोस्टबाबतची माहिती त्यांना समजली नाही. दुसरीकडे, आयफोनचा फोटो पोस्ट करूनही काही माहिती मिळत नाही, हे पाहून हा फोन चार्ज तरी करून पाहावा, असा विचार मगेल यांच्या मनात आला. फोन दीर्घ काळ पाण्यात होता, त्यामुळे तो चार्ज होईल, अशी खात्री त्यांना वाटत नव्हती. परंतु, काही वेळानं फोन चार्ज होऊ लागला. आयफोन पूर्ण चार्ज झाल्यानंतर मगेल यांनी फोन चालू केला. आयफोन चालू झाल्यावर स्क्रीनसेव्हरवर (Screensaver) एक कपलचा (Couple) फोटो आणि त्याखाली 13 ऑगस्ट अशी तारीख दिसली. त्यानंतर पचेको यांनी स्क्रिनसेव्हरवरचा कपलचा फोटो क्लिक करून तो फोटो फेसबुकवर शेअर केला आणि हा फोन सापडला आहे, असं नमूद केलं. ही पोस्ट पाहून डेव्हिस यांच्या एका मित्रानं त्यांना आयफोनविषयी सांगितलं. अखेरीस मगेल यांचा उद्देश सफल झाला आणि हा आयफोन मूळ मालकाला परत मिळाला.याबाबत डेव्हिस म्हणाले, `10 महिन्यांपूर्वी मी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत होतो. त्या वेळी माझ्या खिशातून आयफोन नदीत पडला. फोन परत मिळण्याची आशा मी सोडली होती. परंतु, पचेको यांनी प्रयत्नपूर्वक तो माझ्यापर्यंत पोहोचवला. त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.`
    First published:

    Tags: Daily news, Viral news

    पुढील बातम्या