Home /News /viral /

मुलीला आई नव्हे तर कोण मारतंय पाहा! तिने असं काय केलं की कुत्र्याने केली धुलाई, VIDEO

मुलीला आई नव्हे तर कोण मारतंय पाहा! तिने असं काय केलं की कुत्र्याने केली धुलाई, VIDEO

तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला आईसारखे काठी घेऊन मारताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिलं नसेल, तर तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडीओ जरूर पहा, ज्यामध्ये एका कुत्र्याने मुलीला काठीने जोरजोरात मारलं आहे.

मुंबई, 26 जानेवारी: प्राणी पाळण्याची सवय अनेकांना असते. काही लोक कुत्रा, मांजर असे प्राणी आवडीने पाळतात. एवढंच नाही तर काही लोकांना पाळलेले प्राणी आपल्या घरातील सदस्य असल्यासारखेच वाटतात. आता याच पाळीव प्राण्याने तोंडामध्ये काठी धरून त्या काठीने एखाद्याला जोरजोरात मारण्यास सुरुवात केली तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण असाच काहीसा प्रकार घडला आहे. खोडी काढल्यानंतर मुलाला अनेकदा आईने काठीने, झाडूने मारल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका पाळीव कुत्र्याने चक्क तोंडामध्ये काठी घेऊन त्याच काठीने एका मुलीला मारले आहे. ही मुलगी त्या कुत्र्याचा व्हिडीओ तयार करत होती. मुलांनी एखादी चूक केल्यावर आईला खूप राग येतो, आणि मुलांना समोर जे काही पडलेलं असेल ते उचलून ती मारते. तुम्हीही असा आईचा मार कधी ना कधी खाल्ला असेलच. मात्र, मारल्यानंतर थोड्यावेळाने आईच मुलांना प्रेमाने समजून सांगते. पण तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला आईसारखे काठी घेऊन मारताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिलं नसेल, तर तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडीओ जरूर पहा, ज्यामध्ये एका कुत्र्याने मुलीला काठीने जोरजोरात मारलं आहे. हे वाचा-बेस्ट फ्रेंडलाच लग्नात No entry; नवरीबाईने ठेवली विचित्र अट कारण... कुत्र्याचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. doglovetreats नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram Viral Video) अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून तो लोकांना खूप आवडतोय. हा व्हिडीओ शेकडो लोकांनी लाइक केला आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर (Instagram Reels Video) कमेंट दिली आहे. या व्हिडीओला 'डाय डाय डाय...' असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये नेमकं काय? व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये खोलीत एक मुलगी असून ती सोफ्यावर बसून कुत्र्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसतं आहे. कुत्र्याने त्याच्या दातांमध्ये काठी धरून मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगीही हसतहसत कुत्र्याचा मार खात असून याचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात शूट करत आहे. हा कुत्रा तिला का मारतो आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील कुत्रा आकाराने लहान आहे. पण तो करत असलेलं काम पाहून अनेकांना धक्का बसल्याचं व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटवरून दिसत आहे.
घरात एखादा पाळीव प्राणी असला की वातावरण प्रसन्न राहते. हा पाळीव प्राणी घरातील महत्त्वाचा सदस्यच बनतो. आता तर सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे छोटछोटे व्हिडिओ तयार करून टाकण्याचे प्रकारही सुरू झाले असून अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडीयावर दिसतात
First published:

Tags: Dog, Shocking viral video, Viral video., Viral videos

पुढील बातम्या