Home /News /viral /

एका Instagram पोस्टमधून 'ती' कमावते 12 लाख! वय अवघे 6 वर्ष पण आहेत 50 लाख फॉलोअर्स

एका Instagram पोस्टमधून 'ती' कमावते 12 लाख! वय अवघे 6 वर्ष पण आहेत 50 लाख फॉलोअर्स

सध्या इन्स्टाग्राम हे एक कमाईचं साधन बनलं आहे. सहा वर्षांची एक मुलगी फक्त एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तब्बल 12 लाख रुपये कमावते. या मुलीचे इन्स्टाग्रामवर 50 लाख फॉलोअर्स आहेत.

मुंबई, 26 जानेवारी: जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत इन्स्टाग्राम (Instagram) सर्वाधिक लोकप्रिय आहे. अगदी बॉलिवूड सेलेब्रिटीजपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांतले नागरिक याचा वापर करतात. तसंच वेगवेगळे अपडेट्सदेखील त्यावर देत असतात. सध्या इन्स्टाग्राम हे एक कमाईचं साधन बनलं आहे. सहा वर्षांची एक मुलगी फक्त एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तब्बल 12 लाख रुपये कमावते. या मुलीचे इन्स्टाग्रामवर 50 लाख फॉलोअर्स आहेत. Daily Star च्या वृत्तानुसार, या 6 वर्षांच्या मुलीचं नाव स्‍कार्लेट स्‍नो बेलोजो असं आहे. ती त्वचाशास्त्रज्ञ विकी बेलो आणि हेडन खो ज्युनियर यांची मुलगी आहे. तिचा जन्म मार्च 2015 मध्ये झाला होता. ही मुलगी फक्त एका पोस्टमधून जवळपास 12 लाख रुपये कमावते. ती खास असं काही पोस्ट करत नाही. ती फक्त आपल्या रूटीनमधले काही फोटोज पोस्ट करते; मात्र यामुळे ती प्रसिद्ध झाली आहे. हे वाचा-चमत्कारच! काही सेकंदात फुटणारा बबल तब्बल 465 दिवस टिकला; यात इतकं काय होतं खास ही मुलगी एका पोस्टच्या माध्यमातून 7 लाख 50 हजार ते 12 लाख रुपये कमावते. आतापर्यंत तिने तिच्या अकाउंटवर 1500 हून अधिक पोस्ट्स केल्या आहेत. या पोस्टमध्ये बागेतले आणि आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे मजेदार फोटो पोस्ट केलेले आहेत.
इन्स्टाग्राम (Instagram) हा महत्त्वाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्राम पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्हीदेखील इन्स्टाग्रामद्वारे भरभक्कम कमाई करू शकता. यासाठी तुमचे इन्स्टाग्रामवर जास्त संख्येने फॉलोअर्स असायला हवेत. तुमचे फॉलोअर्स कमी असतील, तर तुम्ही चांगला कंटेट, हॅशटॅग्जचा वापर, आणि चांगले फोटोज किंवा व्हिडिओ पोस्ट करून आपले फॉलोअर्स वाढवू शकता. हे वाचा-ऑनलाईन ऑर्डर केलेला चिकन रोल चावला आणि...; घास तोंडाबाहेर काढताच हादरली महिला यासाठी तुम्हाला इन्स्टाग्रामच्या विविध बाबींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इन्स्टाग्रामवर रील हे फारच लोकप्रिय फीचर आहे. यावर तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाही. त्यामुळे इन्स्टाग्राम हे मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि मनोरंजनाचं उत्तम साधन बनले आहे. पूर्वीची फेसबुक आणि आताची मेटा कंपनी या ॲपची मालक आहे. जगातली सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदलून अलीकडेच मेटा असं केलं आहे. रिब्रँडिंगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.
First published:

Tags: Instagram, Instagram post, Social media

पुढील बातम्या