नवी दिल्ली 21 डिसेंबर : नुकतीच एक अतिशय आगळीवेगळी लव्हस्टोरी (Unique Love Story) समोर आली आहे. यात दोन वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या दोघांची इन्स्टाग्रामवर (Instagram Love story) चॅटिंग सुरू झाली. 6 महिने ते एकमेकांसोबत बोलत होते. यातील युवकाचं वजन 140 किलो आहे तर तरुणी दिसायला अतिशय सुंदर आहे. दोघांच्या या जोडीला ट्रोलर्सनी भरपूर ट्रोल केलं आहे. मात्र, तरीही हे दोघं एकमेकांच्या सोबत आहेत. दोघांना ओलिवर नावाचा एक मुलगाही आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, 26 वर्षाची सिएना कीरा (Sienna Keera) ऑस्ट्रेलियातील रहिवासी आहे. तर 27 वर्षाचा जॉर्ज कीवुड (George Keywood) यूकेमध्ये राहतो. जॉर्ज एक अभिनेता आहे. मात्र, ट्रोलर्स त्यांची ही सुंदर जोडी बघवत नाही. मात्र हे दोघंही आता टिकटॉकवर भरपूर प्रसिद्ध झाले आहेत.
View this post on Instagram
दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. इन्स्टाग्रामवर जवळपास सहा महिने या दोघांचंही बोलणं होत होतं. जॉर्ज कीवुडने बीबीसीची कॉमेडी सीरिज पीपल जस्ट डू नथिंगमध्येही (People Just Do Nothing) काम केलं आहे.
यादरम्यान सिएनाने आपल्या सेक्स लाईफबद्दल सांगितलं की हे बेस्ट आहे. त्यांनी याबाबत ट्रोलर्ससाठीही व्हिडिओ शेअर केला. तिने हेदेखील सांगितलं की दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याशिवाय दोघांचं आपल्या मुलावरही खूर प्रेम आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर काही लोक त्यांनी वाईट बोलतात तर काही लोक टिकटॉक कपल म्हणून त्यांना ओळखतात. अनेकजण जॉर्जच्या वजनावरुन त्याची मस्करी करतात. मात्र काही यूजर्स असेही आहेत जे त्यांचं कौतुक करतात.
सिएना म्हणते की मी माझ्या प्रेमासाठी ऑस्ट्रेलियामधून यूकेला आले. आम्ही दोघं सुरुवातीचे सहा महिने फोनवरच बोलत होतो. आम्ही जसे आहोत, तसंच लोकांनी आम्हाला स्वीकारावं अशी इच्छाही तिने व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Love story, Viral news