Home /News /viral /

सत्तरीपार या आजींचा fitness पाहून तरुणही लाजतील, आहेत 12 lakh followers, पहा अविश्वसनीय VIDEOS

सत्तरीपार या आजींचा fitness पाहून तरुणही लाजतील, आहेत 12 lakh followers, पहा अविश्वसनीय VIDEOS

Inspiring Fitness Story on 74 Years old Lady: या आजींचा फिटनेस पाहून तुम्हालाही फिट राहण्याची तगडी प्रेरणा मिळेल.

  ओन्टारियो, 23 मार्च : वाढत्या वयासोबत सहसा माणूस हतबल होत जातो. त्याला विविध आजार आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, तोंडातील दात निरोप घेऊ लागतात. (Joan old woman fitness story) परिस्थिती अशी निर्माण होते, की शरीराला सरळ करण्यासाठी काठीचा  लागतो. यालाच आपण म्हणतो म्हातारपण. इथे मात्र एका आजींबाबत वेगळेच काही घडले आहे. या आजींनी जणू म्हातारपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे.  (Joan fitness story on insta) या आजीचं वय आहे 74 वर्ष. त्या कॅनडामध्ये राहतात. ओन्टारियो इथं. या आजीला पाहून तुम्हीही म्हातारपणाचा नव्यानं विचार करू लागाल. या आजीचं नाव आहे जोन. यांचं म्हणणं आहे, की त्यांच्या या जीवनशैलीमागे त्यांच्या मुलीचा हात आहे. (Joan fitness inspiring story)
  तिनं आयुष्य बदलण्यात त्यांची खूप मदत केली. आजीनं आधी योगा आणि कार्डिओपासून सुरवात केली. त्यानंतर थेटच वेटलिफ्टिंग सुरू केलं. (Fitness of Old Lady Joan from Canada) सुरवातीला आजीला अगदी 5 किलोही वजनदार वाटायचं. मात्र आता त्या अगदी मोठं वजनही सहज उचलतात. त्यांचा व्यायाम आणि फिटनेस  वाटत नाही की त्या एक वृद्ध महिला आहेत. हेही वाचा आजींनी घेतली कोरोना लस, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं वाचून झाल्या भावूक जोन यांनी मागच्या काही काळात 28 किलो वजन कमी केलं आहे. आजीचं trainwithjoan नावाचं एक इन्स्टा पेज आहे. इथं 12 लाख लोक त्यांना फॉलो करतात.
  आजी सांगतात, की त्यांनी स्वतःला फिट ठेवण्याची सुरवात तीन वर्षांपूर्वी केली. त्याआधी त्या कोलेस्ट्रॉल, हाय बीपी अशा त्रासांसाठी अनेक औषधं घ्यायच्या. हेही वाचा तरुणींच्या स्टंटला नेटकऱ्यांकडून मिळाली वाह वाह!पोलिसांच्या कारवाईनं घडवली अद्दल डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, की जीवनशैलीत बदल केला नाही तर औषधांच्या मदतीनंच जगावं लागेल. आजीनं हे आव्हान स्वीकारत अविश्वसनीय फिटनेस मिळवला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Canada, Fitness, Health, Inspiring story, Instagram, International, Old woman, Social media viral, Wellness

  पुढील बातम्या