मराठी बातम्या /बातम्या /Viral /मोगॅम्बो, हिटलर ते भल्लालदेव; इथं कीटकांना का दिली जातायेत अशी नावं; संशोधकांनी सांगितलं कारण

मोगॅम्बो, हिटलर ते भल्लालदेव; इथं कीटकांना का दिली जातायेत अशी नावं; संशोधकांनी सांगितलं कारण

इथं कीटकांना का दिली जातायेत अशी नावं

इथं कीटकांना का दिली जातायेत अशी नावं

सहसा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना नावे देतात. पण कर्नाटकात कीटकांना नावे दिली आहेत. तीही साधीसूधी नाहीत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Karnataka, India

  गदग, 8 फेब्रुवारी : मोगॅम्बो, रामू काका या नावांशी कदाचित तुम्ही परिचित असताल. बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते अमरीश पुरी आणि एके हंगल यांची ही ऑन-स्क्रीन नावं आहे. कर्नाटकातील गदगमधील संशोधकांनी आता कीटकांना (बग्ज) ही नावं दिली आहेत. ही नवीन नामकरण पद्धत सध्या ट्रेंडिंग आहे आणि विद्यार्थी व संशोधकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे.

  Apeflypupa2 या कीटकाला 'मोगॅम्बो' असं नाव देण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात साकारलेल्या खलनायक पात्राचं 'मोगॅम्बो' हे नाव होतं. तर, Halyomorpha Halys या कीटकाला 'रामू काका' हे नाव देण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते ए.के. हंगल यांनी अनेक चित्रपटांमध्ये याच नावाची भूमिका साकारलेली होती.

  संशोधक म्हणतात की, ख्यातनाम व्यक्तींना आदरांजली वाहणं आणि किटकांचा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणं, असा या उपक्रमाचा दुहेरी हेतू आहे.

  संशोधक संगमेश कडागड आणि मंजुनाथ नायक म्हणाले, "कनिष्ठ संशोधकांना कीटक सहज ओळखता यावेत यासाठी आम्ही त्यांना प्रसिद्ध नावं देत आहोत. आम्ही कनिष्ठ संशोधकांना अगोदर कीटकांची वैज्ञानिक नावं सांगतो आणि नंतर महापुरुषांची नावं निवडतो. असं केल्यानं संशोधक विद्यार्थ्यांना नमुन्यांची नावं सहज लक्षात राहज आहेत. आम्ही प्रसिद्ध राजकारणी आणि क्रिकेटपटूंच्या लूक आणि मॉर्फोलॉजीच्या आधारावर काही कीटकांची नावंदेखील ठेवली आहेत. पण, अद्याप त्यांना अंतिम यादी जाहीर केलेली नाही."

  वाचा - अमरावतीच्या श्रद्धाने अमेरिकन नवऱ्याला शिकवला नागिन डान्स; झिंगाट Video

  हा ट्रेंड आणखी कुठे स्वीकारण्यात आला?

  काही दिवसांपूर्वी, जर्मन हुकूमशहाच्या चेहऱ्याशी साम्य असल्यामुळे कॅटाकॅन्थस इनकार्नेटस या कीटकाला ‘हिटलर’ हे नाव देण्यात आलं होतं. तेव्हापासून कीटकांना लोकप्रिय व्यक्तींची नावं देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे, मोगॅम्बो बग हा 'मिस्टर इंडिया'मधील अमरीश पुरीच्या पात्रासारखा दिसतो.

  4 फेब्रुवारी रोजी Apeflypupa2 बगचा अभ्यास करणाऱ्या काही संशोधकांनी त्याचं नाव ए. के. हंगल ठेवलं. याच कीटकाला ते 'रामू काका' असंही म्हणत आहेत. रामू काका हे हंगल यांचं ऑन-स्क्रीन नाव होतं.

  गेल्या आठवड्यात, एका गांधील माशीच्या (व्हॅस्प) नवीन प्रजातीला 'सोलिगस' हे नाव देण्यात आलं. हे कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बिलीगिरी रंगन हिल्स (बी.आर. हिल्स) मधील स्थानिक समुदायाचं नाव आहे. वन आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचं नाव गांधील माशीच्या प्रजातीला देण्यात आलं आहे.

  सोमवारी (6 फेब्रुवारी) गदग शहरात प्रदीर्घ काळानंतर दिसलेल्या एका नवीन कोळ्याला 'बाहुबली' फेम 'भल्लाळदेव' असं नाव देण्यात आलं आहे. कारण, त्याचं शरीर चित्रपटात भल्लालदेवाने वापरलेल्या रथासारखं आहे.

  First published:

  Tags: Bollywood, Karnataka