मुंबई : होळीनंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. आता एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत तर उन्हाळा उच्चंक गाठू शकतं. असे काही भाग आहेत, जेथे उन्हाळ्यात खूप जास्त तापमान असतं. ज्यामुळे लोक चक्क घराबाहेर पडणं देखील बंद करतात. उन्हाळ्यात लोकांना शरीर थंड आणि शांत ठेवण्याची जास्त गरज असते. यासाठी अनेक लोक थंड पदार्थ खाण्यावर किंवा पिण्यावर भर देतात.
यामध्ये फळ, ताक, दही, शिकंजी, फळांचा रस तसेच गोळा, आइस्क्रीम यासारखे पदार्य येतात. लोक हे पदार्थ आवडीने खातात. पण लोकांनी अनेकदा पाहिलं असेल की ताकाचा मटका किंवा शिकंजीचं भांडं हे लाल कपड्याने झाकलं जातं.
TTE आणि TC दोन्ही सारखंच की वेगवेगळं? रेल्वेबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीय?
बरेचसे गाडीवाले किंवा गाडीवर हे सगळं विकणारे थेलेवाले हे लाल कपड्यांनीच झाकतात. पण ते असं का करतात तुम्हाला माहितीय?
आता तुम्ही म्हणाल की ते भांडं थंड राहण्यासाठी असं केलं जातं. तर हे कारण काही प्रमाणात बरोबर आहे. पण मग यासाठी लाल कपडाच का? किंवा अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की चाट वाले, पाणीपुरीवाले हे लोक देखील लाल कपडा वापरतात मग असं का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
खरंतर लाल रंग अतिशय तेजस्वी असतो आणि तो लोकांचं लक्ष आपल्याकडे सहजपणे खेचून घेतो. यामुळेच ग्राहकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जावे म्हणून लोक त्यांच्या गाड्यांवर लाल कापड लावतात. हातगाडीवर लाल रंगाचे कापड खाद्यपदार्थांची विक्री करताना दिसत आहे. पण यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण.
शाळेत आपल्याला शिकवलं जातं की लाईट हा सात रंगानी बनलेला असतो. त्याची तरंगलांबी (वेवलेंथ) सर्वाधिक आहे, तर वारंवारता (फ्रिक्वेंसी) सर्वात कमी आहे. प्रकाश किंवा दिवे लहरीसारखे कार्य करतात. यामध्ये, वेवलेंथ जितकी जास्त आणि फ्रिक्वेंसी कमी तितकी ती उजळ असेल. यामुळेच लाल रंगाकडे लोकांचे आकर्षण जास्त आहे. आता जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाकली तर लाल रंगाची वस्तू तुम्हाला आधी आकर्षित करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Social media, Top trending, Viral