Home /News /viral /

लेडी धर्मेंद्र! बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी

लेडी धर्मेंद्र! बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी

अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या आग्रह ठरून ही तरुणी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली. इंदूरच्या परदेशीपुरा भागात हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

    इंदूर, 10 नोव्हेंबर : प्रेमासाठी काहीही करण्यासाठी लोकं तयार होतात. मात्र एक तरुणीनं कहर केला. अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या आग्रह ठरून ही तरुणी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली. इंदूरच्या परदेशीपुरा भागात हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीने होर्डिंगवर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली. तरुणीला खांबावर चढलेलं पाहून लोकांची गर्दी घटनास्थळी जमली लोकांनी पोलिसांना बोलवलं. तब्बल 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर पोलिसांनी तरुणीची समजूत घातली आणि तिला खाली उतरवले. तरुणीला खांबावर चढलेलं पाहून लोकांनी तुफान गर्दी केली, शोले स्टाइल तरुणीचा हा प्रकार पाहून काही लोकांनी व्हिडीओ आणि फोटो काढण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या मुलीची समजूत घालून तिला खाली उतरवले आणि कुटुंबीयांसह घरी पाठविण्यात आले. वाचा-नातवाला शिकवता शिकवता आजीचं नशीब फळफळलं; पुस्तकात मिळाला असा खजिना झाली कोट्यधीश इंदूरमधील परदेशीपुराच्या पुलाजवळील ही घटना आहे. ही तरुणी येथील एका जाहिरातीच्या होर्डिंगवर चढली. तरुणी यावेळी एकच गोष्ट म्हणत होती की, तिचे लग्न तिच्या प्रियकराबरोबर झाले नाही तर ती उडी मारून आत्महत्या करेल. तरुणीच्या आईने तिच्यासाठी वेगळं स्थळ पाहिले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच परदेशीपुरा पोलूस ठाण्याचे प्रभारी अशोक पाटीदार घटनास्थळी दाखल झाले. वाचा-हे '2' शब्द ऐकताच 62 दिवसानंतर कोमातून बाहेर आला तरुण; डॉक्टरही झाले हैराण तब्बल 45 मिनिटे चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्रामानंतर,तरुणीला होर्डिंगच्या खांबावरून खाली आणले. त्यानंतर पोलीस तरुणीला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले. तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनाही येथे बोलवले होते. यावेळी तरुणीचे समुपदेशन करण्यात आले. परदेशीपुरा पोलीस स्टेशनचे अध्यक्ष अशोक पाटीदार म्हणाले की, मुलीचे वय 18 वर्षे आहे. तिचे एका अल्पवयीन मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मात्र घरातल्यांचा या लग्नाला विरोध होता, म्हणून मुलीनं असे सगळे केल्याचे सांगितले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या