मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् विमानातच ढसाढसा रडू लागली एअर होस्टेस; VIDEO पाहून भावुक झाले लोक

...अन् विमानातच ढसाढसा रडू लागली एअर होस्टेस; VIDEO पाहून भावुक झाले लोक

Air Hostess Emotional Video: इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती फ्लईटमध्ये उभा राहून इमोशनल फेअरवेल स्पीच देताना दिसते

Air Hostess Emotional Video: इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती फ्लईटमध्ये उभा राहून इमोशनल फेअरवेल स्पीच देताना दिसते

Air Hostess Emotional Video: इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती फ्लईटमध्ये उभा राहून इमोशनल फेअरवेल स्पीच देताना दिसते

नवी दिल्ली 19 एप्रिल : निरोप घेणं हा नेहमीच कोणत्याही प्रवासाचा सर्वात कठीण भाग असतो. विशेषत: जर ती एखादी संस्था किंवा कार्यस्थळ असेल, तर हा प्रसंग अधिक भावुक करणारा असतो. कारण अनेकदा ते तुमचं दुसरं घर बनलेलं असतं. इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती फ्लईटमध्ये उभा राहून इमोशनल फेअरवेल स्पीच देताना दिसते. व्हिडिओमध्ये सुरभी नायर नावाची इंडिगो फ्लाइट अटेंडंट प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्सला संबोधित करताना स्वतःचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसते (IndiGo Air Hostess Emotional Video).

Wedding Video: 'कोणी रडत का नाहीये'? पाठवणीच्या वेळी नवरीने प्रश्न विचारताच कुटुंबीयांनी दिलं मजेशीर उत्तर

व्हिडिओमध्ये सुरभी नायर तिच्या कामाच्या शेवटच्या दिवशी स्पीच देण्यासाठी विमानात पब्लिक अॅड्रेस सिस्टम वापरताना दिसते. सुरभी म्हणाली, 'हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं. हे काम माझ्या हृदयाच्या तुकड्यासारखं आहे. मला काय बोलावं कळत नाही.' पुढे तिने आपल्या कंपनीचं आणि सहकाऱ्यांचं कौतुक केलं की, 'या कंपनीनं मला सर्व काही दिलं आहे, काम करण्यासाठी ही एक अतिशय उत्तम संस्था आहे. ते प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः आम्हा मुलींची खूप चांगली काळजी घेतात. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. असं वाटतंय की मला इथून जाण्याची अजिबात इच्छा नाही, पण मला जावं लागेल'

तिने प्रवाशांचे आभार मानले आणि म्हणाली की, 'सर्वांचे आभार. आमच्याबरोबर उड्डाण करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमच्यामुळेच आम्हाला आमचा पगार वेळेवर किंवा वेळेआधी मिळतो.'

कुस्ती पाहण्यासाठी आलेली तरुणीच आखाड्यात उतरली; पैलवानांची केली जबर धुलाई, Video Viral

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, ज्यात तिच्या अनेक सहकाऱ्यांनी तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर्टिस्ट अलसेंड्रा जॉन्सनने लिहिलं, 'सुरभी तू एक खूप चांगली क्रू मेंबर होतीस, त्यापेक्षा तू एक चांगली व्यक्ती आहेस. तू खूप दयाळू आणि नम्र आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही, असं मी कधीच पाहिलं नाही. तू अतिशय सकारात्मक आहे, शुभेच्छा. आता इथून पुढे मलाही तुझ्यासोबत उड्डाण करता येणार नाही. मात्र तरीही तुझ्यासोबत भरपूर सुंदर आठवणी मिळाल्या. तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा.'

First published:
top videos

    Tags: Airplane, Domestic flight