• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दैव बलवत्तर! अंधारात ट्रॅकवर फिरत होते हत्ती, मागून सुसाट ट्रेन आली पण... पाहा VIDEO

दैव बलवत्तर! अंधारात ट्रॅकवर फिरत होते हत्ती, मागून सुसाट ट्रेन आली पण... पाहा VIDEO

ट्रॅकवर फिरत होते जंगली हत्ती, ट्रेनमधल्या मोटरमननं पाहिलं आणि वाचला हत्तींचा जीव. VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक.

 • Share this:
  कोलकाता, 12 नोव्हेंबर : रेल्वे रुळ ओलांडताना अनेक वन्य प्राण्याचा अपघात होतो. यात बऱ्याचदा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र पश्चिम बंगालमध्ये मोटरमनच्या प्रसांगवधानामुळे तीन हत्तींचा जीव वाचला. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या मोटरमनचे कौतुक केले जात आहे. तीन हत्तीवर रुळावरून फिरत आहेत, हे पाहिल्यानंतर मोटरमननं ट्रेन थांबवली. हत्ती रेल्वे रुळ पार करेपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर पुन्हा ट्रेन सुरू केली. मोटरमननं हत्तींचा जीव वाचवल्याबद्दल देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. वाचा-डेअरी प्लांटमध्ये दुधाने भरलेल्या टबमध्ये मजेत अंघोळ करताना केला VIDEO वाचा-फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यासाठी अजब जुगाड, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का रेल्वे मंत्री गोयल यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, पश्चिम बंगालमधील शिवोक-गुलाम रेल्वे ट्रॅकवर हत्ती रेल्वे रूळ पार करत होते. यावेळी तात्काळ मोटरमननं ब्रेक दाबत, या हत्तींचा जीव वाचवला. हत्ती सुरक्षित बाहेर रुळाबाहेर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्रेन सुरू केली. वाचा-प्रेमासाठी वाट्टेल ते: पोलीस महाशयांनी प्रेयसीच्या घरी पाठवली बंदी असलेली वाळू हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या मोटरमनचे कौतुक केले जात आहे. तर लोकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  Published by:Priyanka Gawde
  First published: