मराठी बातम्या /बातम्या /Viral /ट्रेनच्या डब्यांवरील या कोडमध्ये लपलीय खास माहिती, तुम्हाला ती माहीत असायलाच हवी

ट्रेनच्या डब्यांवरील या कोडमध्ये लपलीय खास माहिती, तुम्हाला ती माहीत असायलाच हवी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपल्यापैकी अनेकांनी हे पाहिले असतील, पण त्या कोडचा अर्थ काय हे आपल्याला माहित नसावा, हा कोड एक साधा नंबरने बनलेला असला तरी देखील, त्यामध्ये ट्रेन प्रवासाशी संबंधीत काही गोष्टी लपल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 20 डिसेंबर : तुमच्यापैकी सर्वांनी एकदा तरी रेल्वेने प्रवास केलाच असेल. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतोच, शिवाय तो लोकांना वेळेवर देखील आपल्या ठरलेल्या स्थानी पोहोचायला मदत करतो. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला देशाची जीवनरेखा म्हटले जाते. अनेक लोकांनी त्यामधून अनेकदा प्रवास केला असेल, पण तरी देखील त्यांना हा प्रश्न कदाचित कधीच पडला नसावा किंवा त्यांनी याबाबत विचार केला नसावा. तो म्हणजे ट्रेनच्या डब्यांवरील नंबर.

आपल्यापैकी अनेकांनी हे पाहिले असतील, पण त्या कोडचा अर्थ काय हे आपल्याला माहित नसावा, हा कोड एक साधा नंबरने बनलेला असला तरी देखील, त्यामध्ये ट्रेन प्रवासाशी संबंधीत काही गोष्टी लपल्या आहेत.

ट्रेनच्या डब्यावरील 5 अंकांमध्ये अनेक प्रकारची माहिती लपलेली असते. त्यात बोगी, त्याचे उत्पादन वर्ष आणि कोचचा प्रकार याबद्दल माहिती असते.

हे ही पाहा : गेंड्याच्या बाळाला जन्म घेताना पाहिलंय? हा Video आश्चर्यचकीत करणारा

5 पैकी पहिले 2 आकडे कोणत्या वर्षी कोच बनवले गेले ते दर्शवतात. त्याच वेळी, शेवटचे तीन क्रमांक सांगतात की तो कोणत्या प्रकारचा कोच आहे.

ट्रेनच्या डब्यावर लिहिलेल्या कोडमधून कोचची माहिती काढायची असेल, तर ती दोन भागात विभागली पाहिजे. उदाहरणार्थ, जर कोचची संख्या 00296 असेल तर त्याला 00 आणि 296 मध्ये विभाजित करा. त्याचे पहिले दोन कोड म्हणजे ती ट्रेन 2000 साली तयार केली गेली आहे. जर कोचवर 95674 लिहिले असेल तर याचा अर्थ हा डबा 1995 मध्ये बनवला गेला असावा.

उदा.

शेवटच्या 3 कोडचा अर्थ

5 मधील शेवटच्या तीन संख्यांचा अर्थ त्याचा प्रकार आहे. उदाहरणार्थ, जर कोचची संख्या 00296 असेल, तर त्याचा दुसरा भाग म्हणजे 296 सांगते की तो स्लीपर (द्वितीय श्रेणीचा स्लीपर) कोच आहे. दुसरीकडे, जर कोचचा क्रमांक 95674 असेल, तर याचा अर्थ तो द्वितीय श्रेणीची आसनव्यवस्था/जनशताब्दी चेअर कार आहे.

म्हणजेच काय तर 296 हा सेकेंड क्लास स्लीपर कोच, तर 674 हा अंक सेकेंड क्लास सिटर कोच असल्याचे दर्शवते.

खाली एक टेबल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ट्रेनच्या कोचच्या शेवटच्या तीन क्रमांकांद्वारे तो कोणत्या कोचचा असल्याचं ओळखू शकता.

नंबर                 अर्थ

001-025       एसी फर्स्ट क्लास

026-050      कंपोजिट (1AC + AC-2T)

051-100       एसी-टू टियर

101-150        एसी- थ्री टियर

151-200       सीसी (एसी चेयर कार)

201-400      स्लीपर (सेकेंड क्लास स्लीपर)

401-600      जनरल सेकेंड क्लास

601-700      सेकेंड क्लास सीटिंग/जन शताब्दी चेयर कार

701-800      सीटिंग कम लगेज रॅक

801+            पँट्री कार, जनरेटर आणि मेल

First published:

Tags: Indian railway, Social media, Top trending, Train, Viral