मुंबई 6 सप्टेंबर : माणसाचं नशीब बलवत्तर असले तर कोणीही त्याचं काहीही वाकडं करु शकत नाही. असं आपण अनेकांना बोलताना पाहिलं असेल. परंतू यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तसे पाहाता सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. परंतू हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.
या व्हिडीओमध्ये सुरूवातीला आपल्याला एक ट्रेन दिसत आहे. जी प्लॅटफॉर्मवरुन भरधाव वेगाने जात आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला आपल्याला काही कळत नाही की नक्की काय झालंय? पण व्हिडीओच्या शेवटी जे दृश्य दिसतं, ते खरोखरंच धक्कादायक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली-हावडा मार्गावरील इटावामधील भारभाना रेल्वे स्थानकावर मंगळवारी प्रवाशांची मोठी गर्दी होती. तेथे ही घटना घडली. येथे प्लॅटफर्मवर लोक आग्रा सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेसची वाट पाहत होते. तेव्हा ट्रेन फलाट क्रमांक दोनवर पोहोचणार म्हणून प्रवाशांची धावपळ सुरू झाली. यादरम्यान भोला सिंगचे नावाची एक व्यक्ती आपल्या सामानासह प्लॅटफॉर्मवरुन खाली पडली.
हे वाचा : त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली... घटनेचा थरारक Video व्हायरल
भोला सिंग हे उठून प्लॅटफॉर्मवर चढणार, तेवढ्यात पुढच्याच सेकंदाला समोरुन ट्रेन आली. ही ट्रेन या भोला सिंगच्या अंगावरुन जात होती आणि लोक त्याला पाहातच राहिले. त्याचं आता काय होईल याचा विचार कोणीच करु शकत नव्हते. तेथे उपस्थीत सगळ्याच लोकांचे श्वास रोखले गेले होते. हे सगळं घडत असताना तेथील एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.
उत्तर प्रदेश के इटावा में भरथना रेलवे स्टेशन पर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन के नीचे आने के बाद भी यात्री मौत के मुंह से बचकर बाहर निकल गया। #ViralVideo pic.twitter.com/Oa8NKTsU0L
— Hindustan UP-Bihar (@HindustanUPBH) September 6, 2022
साधारणपणे अशा घटनांमध्ये एकतर व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा शरीराचा अवयव कापला जातो. अशा अनेक घटना या आधी घडल्या देखील आहेत. परंतू भोला सिंग यांचं नशीब इतकं चांगलं असतं की, त्यांना काहीही होत नाही.
हे वाचा : नाचण्यात दंग असणाऱ्या काकूंनी चिमुकल्याला पाहिलंच नाही, अचानक मागे आल्या आणि... पाहा Video
ट्रेन जाताच भोला सिंग उठून उभे राहिले आणि लोकांसमोर हात जोडून आभार मानू लागले, तसेच त्यांनी देवाचे देखील आभार मानले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.