Home /News /viral /

आता शत्रूचं काही खरं नाही! क्षणात उद्धवस्त करणार शक्तीशाली BRAHMOS सुपरसॉनिक मिसाइल, पाहा VIDEO

आता शत्रूचं काही खरं नाही! क्षणात उद्धवस्त करणार शक्तीशाली BRAHMOS सुपरसॉनिक मिसाइल, पाहा VIDEO

ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतके शक्तिशाली आहे की विमान वाहकदेखील झटपट नष्ट होऊ शकतात.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारतीय नौदलाने (Indian Navy) रविवारी शक्तिशाली ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइलची चाचणी केली. अरबी समुद्रात आयएनएस चेन्नई या युद्धनौकाच्या माध्यमातून नौदलाने ही चाचणी केली आहे. या लढाऊ जहाजातून लक्ष्यित असलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइलची चाचणी करण्यात आली. आता नौदलाने या चाचणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ब्रह्मोस मिसाइल आयएनएस चेन्नईच्या बाहेर आकाशात आपले लक्ष्य भेदण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. रविवारी घेण्यात आलेल्या चाचणीत ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइलने पूर्ण अचूकतेने लक्ष्य ठेवले. यामुळे नौदलाची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. हे जहाजविरोधी मिसाइल युद्धनौकांमध्ये तैनात असल्याची चर्चा आता समोर येत आहे. हे एक लांब पल्ल्याचे प्राणघातक मिसाइल आहे. आयएनएस चेन्नई ही एक स्वदेशी युद्धनौका आहे. वाचा-PPE सूट घालून 'घुंघरू'वर धरला ताल; डॉक्टरच्या भन्नाट डान्सचा VIDEO एकदा पाहाच वाचा-VIDEO:..आणि दुर्गा अवतरली! अपहरण करणासाठी आलेल्या अज्ञातांना महिलेनं धू-धू धुतलं याआधी 30 सप्टेंबर रोजी, भारतीय नौदलाने सुपरसॉनिक क्रूझ मिसाइलच्या दुसर्‍या आवृत्तीचीही चाचणी घेतली. ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतके शक्तिशाली आहे की विमान वाहकदेखील झटपट नष्ट होऊ शकतात. आक्रमक होण्याव्यतिरिक्त, ब्रह्मोस वेगवान देखील आहे. हे मिसाइल ध्वनीपेक्षा सुमारे 3 पट वेगवान वेगाने भेदते. वाचा-निसर्गाची कमाल! 70 चिमण्यांनी वाजवलं जबरदस्त गिटार, VIDEO पाहून म्हणाल... ब्रह्मोस हे दोन टप्प्यांचे मिसाइल आहे. पहिला टप्पा किंवा स्तर सॉलिड प्रोपेलेंट बूस्टर इंजिनसह सुसज्ज आहे, जो त्याला सुपरसोनिक गती देतो. यानंतर, मिसाइल वेगळे होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या