मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जेवण करून झोपलेला असताना अचानक आला फोन अन् रातोरात झाला करोडपती, वाचा संपूर्ण कहाणी

जेवण करून झोपलेला असताना अचानक आला फोन अन् रातोरात झाला करोडपती, वाचा संपूर्ण कहाणी

काही वर्षांपूर्वी रामा पैशांसाठी दुबईला गेले, तिथे त्यांना स्वयंपाक्याची नोकरी मिळाली. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कंपनीत भारतीय चलनानुसार 700 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले

  • Published by:  Kiran Pharate
जयपूर 05 मार्च : राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातील मुलगा आणि व्यवसायाने दुबईत स्वयंपाकी असलेला रामा मीना रातोरात करोडपती झाला आहे. रामाला दुबईत 20 कोटींची लॉटरी लागली आहे (Rama Meena Became Crorepati) . अचानक त्यांचं नशीब उजळल्यानं त्यांच्या कुटुंबात आणि गावात आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्यातील सबला उपविभागातील ग्रामपंचायत निथोवा येथील सलामगढ इथला गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या रामा मीना यांनी 30 वर्षे मुंबईत चहाच्या दुकानात काम केलं.

71 वर्षीय आजीचं 17 वर्षीय कोवळ्या मुलावर प्रेम; लेकाच्या मृत्यूनंतर लगेच लग्न

काही वर्षांपूर्वी रामा पैशांसाठी दुबईला गेले, तिथे त्यांना स्वयंपाक्याची नोकरी मिळाली. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने एका कंपनीत भारतीय चलनानुसार 700 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. रामाने सांगितलं की ते झोपेत असताना त्यांना कंपनीकडून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भारतीय चलनानुसार रामाने सुमारे 20 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे (Indian man wins 20 Crore lottery in Dubai). ही बातमी ऐकून रामा भारावून गेले आणि त्यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना ही माहिती दिली. यानंतर कंपनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा धनादेश रामाला सुपूर्द करण्यात आला. रामाने सांगितलं की आता ते लवकरच डुंगरपूरला परतणार आहे आणि सगळ्यात आधी कुटुंबावरील थकीत कर्ज फेडणार आहे. गरिबीमुळे संघर्ष करणाऱ्या आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं रामाने सांगितलं. 47 वर्षीय रामा यांना आई-वडील, पत्नी, 4 मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. रामा सांगतात, की ही लॉटरी लागली असल्यावर त्यांचा फार काळ विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर लॉटरीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला. कंपनीच्या विजेत्या यादीत माझं नावही होतं, हे पाहून मला पूर्ण विश्वास बसला.

हे भयानक आहे! हायवेवर इतका Dangerous Bike Stunt; धडकी भरवणारा Video

रामा सांगतात की, गरिबीमुळे त्यांना वयाच्या 11 व्या वर्षीच शिक्षण सोडावं लागलं. नंतर मुंबईत जाऊन चहाच्या दुकानात काम केलं. माझं नशीब इतकं पालटेल असं कधी वाटलंच नाही. मी रोज लॉटरीत लोक करोडपती होताना पाहायचो. मग वाटलं की आपणही नशीब आजमावू. एकाचवेळी मी पाच-पाच तिकिटे खरेदी करायचो. खूप प्रयत्न केले आणि काही वर्षांनी नशिबाने साथ दिलीच.
First published:

Tags: Lottery, Viral news

पुढील बातम्या