Home /News /viral /

खतरनाक जुगाड! केदारनाथमध्ये सामान पोहचवण्यासाठी चक्क पायऱ्यांवर चढवला ट्रॅक्टर, पाहा VIDEO

खतरनाक जुगाड! केदारनाथमध्ये सामान पोहचवण्यासाठी चक्क पायऱ्यांवर चढवला ट्रॅक्टर, पाहा VIDEO

या व्यक्तीने ट्रॅक्टरवर जड मशीन्स लोड केल्या आणि केदारनाथच्या पायऱ्यांवर चढवल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    उत्तराखंड, 21 जुलै : केदारनाथचा (Kedarnath) एक व्हि़डीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. केदारनाथमध्ये सध्या विविध बांधकामांचे काम सुरू आहे. इथं एक पॉवर स्टेशन देखील तयार केले जात आहे. मात्र पॉवर स्टेशन तयार करताना सामान आणि अवजड वस्तू वर कसे घेऊन जायचे, असा प्रश्न असताना एका व्यक्तीने मात्र अजब जुगाड केला. या व्यक्तीने ट्रॅक्टरवर जड मशीन्स लोड केल्या आणि केदारनाथच्या पायऱ्यांवर चढवल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पायर्‍यांवर एक ट्रॅक्टर चालत आहे आणि ट्रॅक्टरच्या मागे मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन दोरीने बांधल्या आहे, ज्याला मागे काही लोकं पकडून आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ट्रॅक्टरमधून माल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. वाचा-हायवेवर गाडी चालवत असताना अचानक समोर आलं हरिण, हद्याचे ठोके वाढवणारा VIDEO हा व्हिडीओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, 'हे फक्त भारतातच होऊ शकते.' वाचा-रस्त्यावर नाचत होते तिघे,पोलीस येताच दोघे पळाले अन् तिसऱ्याला चोप VIDEO एवढेच नाही तर, या ट्रॅक्टरवर सहा लोकं बसली असून, काही लोकं मागून सामान पकडत आहे. अशा परिस्थितीतही ड्रायव्हर मात्र अगदी शांतपणे ट्रॅक्टर चालवत आहे. हा व्हिडिओ त्यांनी 19 जुलै रोजी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच 5 हजाराहून अधिक लाईक्स आणि 800 हून अधिक कमेंट्स आणि री-ट्वीट केले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत. वाचा-आकाशातील मनमोहक रंगामध्ये विजांचा कडकडाट, VIDEO पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या