मराठी बातम्या /बातम्या /Viral /परदेशात भारतीय नागरिकाला सापडली 40 लाखाचं सोनं असलेली बॅग, पोलिसांकडे गेला आणि...

परदेशात भारतीय नागरिकाला सापडली 40 लाखाचं सोनं असलेली बॅग, पोलिसांकडे गेला आणि...

पोलिसांनी रितेशच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले आणि त्याला जबाबदार नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.

पोलिसांनी रितेशच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले आणि त्याला जबाबदार नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.

पोलिसांनी रितेशच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले आणि त्याला जबाबदार नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.

दुबई, 13 सप्टेंबर : सध्याच्या काळात जिथं माणुसकी आणि प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही अशा परिस्थितीत परदेशात एका भारतीयानं प्रामाणिकपणा दाखवला. युएईमध्ये एका भारतीय नागरिकाचा तेथील पोलिसांनी पुरस्कार दिला आहे. रितेश जेम्स गुप्ता या भारतीय नागरिकाने पैसे आणि सोन्याने भरलेली बॅग पोलिसांना परत केली. म्हणून युएई पोलिसांनी रितेश यांचा गौरव केला.

मीडिया रिपोर्टनुसार रितेशला 10 लाख 28 हजार 580 रुपयांनी भरलेली बॅग सापडली होती. दुबईत राहणाऱ्या रितेशने ही बॅग पोलिसांना परत केली. त्यानंतर पोलिसांनी रितेशच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक केले आणि त्याला जबाबदार नागरिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, रितेशकडे सापडलेल्या या बॅगमध्ये 10 लाख 28 हजार 580 रुपयांबरोबरच 40 लाख किमतीचे सोनेही होते. अल कुसाईस पोलीस स्टेशनचे संचालक ब्रिगेडियर युसुफ अब्दुल सलीम अल अदीदी यांनी रितेश गुप्ता यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून हा पुरस्कार दिला.

वाचा-...आणि भिंतीवर चिकटलेल्या बेडकाच्या पोटात अचानक पेटली लाइट, VIDEO VIRAL

यावेळी युसुफ यांनी पोलीस आणि समाज यांच्यातील संबंध खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. रितेश गुप्ता यांनी हा पुरस्कार दिल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. ते म्हणाले की, पोलिसांनी माझा सन्मान करून जी भावना व्यक्त केली ती माझ्यासाठी अभिमान आणि आनंदाची बाब आहे.

वाचा-VIDEO रस्त्यावरची कार बघता बघता गेली वाहून; अवघ्या तासाभराच्या पावसाचा कहर

मेट्रोमध्ये एका व्यक्तीनं दाखवली होती माणूसकी

याआधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक मनुष्य मेट्रोमध्ये एक वृद्ध व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारतातला नसला तरी, 59 सेकंदात माणूसकीचं दर्शन घडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या अंगावरील कपडे काढून एका गरीब वयोवृद्ध व्यक्तीला देताना दिसत आहे.

वाचा-दुचाकीला धडक देऊन कार हवेत उडाली आणि 6 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

मेट्रोमध्ये निवस्त्र फिरणाऱ्या या वृद्ध व्यक्तीकडे पाहून सर्व आश्चर्य व्यक्त करत होते, मात्र त्याच्या मदतीला कोणी आले नाही. अखेर एका व्यक्तीने आपले टी-शर्ट काढून वृद्ध व्यक्तीला दिले. मात्र ही व्यक्ती स्वत: हून टी-शर्टही घालू शकत नाही. यानंतर, या भल्या इसमानं स्वत: या वृद्ध व्यक्तीला कपडे घातले.

First published:
top videos

    Tags: Gold, UAE