आईची माया! ‘कॉलरवाली’नं आपल्या तीन बछड्यांना पाजलं पाणी, पाहा हा हृदयस्पर्शी VIDEO

आईची माया! ‘कॉलरवाली’नं आपल्या तीन बछड्यांना पाजलं पाणी, पाहा हा हृदयस्पर्शी VIDEO

जगप्रसिध्द कॉलवरवाली वाघीणीचा कधीही न पाहिलेला VIDEO एकदा पाहाच.

  • Share this:

नागपूर, 9 नोव्हेंबर : भारतात कमी होणाऱ्या वाघांची संख्या ही धोकादायक बाब आहे. सर्वात चपळ आणि तेवढाच सुंदर अशा वाघोबाला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र फार कमी वेळा वाघीण आपल्या बछड्यांसोबत खास क्षण घालवताना दिसतात. असे क्षण फार क्वचितच पाहायला मिळतात. सध्या अशाच एक क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियन फॉरेस्टचे ऑफिसर सुशांत नंदा यांनी शुक्रवारी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये वाघीण आपल्या बछड्यांसोबत नदी किनाऱ्यांवर पाणी पिताना दिसत आहे. हा व्हिडीओ पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं रेकॉर्ड करण्यात आला आहे. याच पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बंगालच्या कॉलरवाली (Collarwali) या वाघिणीनं जानेवारीत चार बछड्यांना जन्म दिला होता.

या व्हिडीओमध्ये वाघीण आपल्या बछड्यांसोबत पाणी पिताना दिसत आहे. सुशांत यांनी हा व्हीडिओ शेअर करताना, “न खाता हे दोन आठवडे जिवंत राहू शकतात. मात्र पाण्याशिवाय फक्त चार दिवसच वाघीण जिवंत राहू शकते'', अशी कॅप्शन लिहिले आहे.

गेल्या 13 वर्षात या वाघिणीनं 29 बछड्यांना जन्म दिला आहे. या एक वर्ल्ड रेकॉर्ड असून, कॉलरवाली वाघिणीच्या नावावर आहे.

----------------

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading