मराठी बातम्या /बातम्या /Viral /आईचं प्रेमचं ते! वाघिण आणि तिच्या छाव्याचा एकमेकांना मिठी माराताना क्यूट VIDEO VIRAL

आईचं प्रेमचं ते! वाघिण आणि तिच्या छाव्याचा एकमेकांना मिठी माराताना क्यूट VIDEO VIRAL

हा व्हिडीओ एका वाघिणीचा आणि तिच्या छाव्याचा आहे. आपल्या आईसोबत खेळता खेळता एक छावा आपल्या आईला मिठी मारून बसलेला एक व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.

नवी दिल्ली, 30 जानेवारी : आपल्या मुलावर आईइतकं प्रेम कोणीच करू शकत नाही. आईच्या मिठीत विसावण्याइतकं आरामदायी, सुखही कुठेही नाही. अशाच एका आई आणि तिच्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका वाघिणीचा आणि तिच्या छाव्याचा आहे. आपल्या आईसोबत खेळता खेळता एक छावा आपल्या आईला मिठी मारून बसलेला एक व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.

सुसंता नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाघिण आपल्या छाव्यासोबत खेळताना दिसतेय. वाघिणीच्या अवती-भवती खेळता खेळता छावा तिला मिठी मारतो. वाघिणी आणि तिच्या छोट्या छाव्याचा मिठी मारतानाचा क्यूट क्षण कॅमेरात कैद केला गेला आहे. 'Happiness is a mother's hug' असं कॅप्शन देत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

(वाचा - हत्तीशी पंगा घेणं सिंहिणीला पडलं भारी, गजराजनं घडवली अद्दल पाहा VIDEO)

इंटरनेटवर हा व्हिडीओ अनेकांकडून पाहण्यात आला असून त्याला अनेक नेटकऱ्यांची मोठी पसंतीही मिळते आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओ कमेंटही केल्या आहेत.

हा व्हिडीओ 17 हजारहून अधिक वेळा पाहण्यात आला असून त्याला 2100 हून अधिक वेळा लाईक केलं गेलं आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा नेहमी प्राण्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला मोठी पसंतीही मिळते आहे.

First published:

Tags: Video viral