मराठी बातम्या /बातम्या /Viral /देवाचा चमत्कार? असं काहीतरी घडलं की क्षणार्धात अपंग व्यक्तीही धावू लागला, पाहा मजेदार VIDEO

देवाचा चमत्कार? असं काहीतरी घडलं की क्षणार्धात अपंग व्यक्तीही धावू लागला, पाहा मजेदार VIDEO

भारतीय व्यावसायिक हर्ष गोयंकानी (Harsh Goenka) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ एका भीक मागणाऱ्या अपंग व्यक्तीचा (Handicapped beggar) असून सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल (Viral) होत आहे.

मुंबई, 05 फेब्रुवारी: भारतीय व्यावसायिक हर्ष गोयंका सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असतात. ते नेहमी सोशल मीडियावर त्यांची सामाजिक मतं आणि मनोरंजनात्मक पोस्ट करत असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका भिकाऱ्याचा असून त्यावर अनेक भन्नाट कमेंट यायला सुरुवात आली आहे.

हा व्हिडिओ काही युवकांनी योजना आखून बनवला आहे. एक भिकारी रस्त्याच्या मधोमध बसून भीक मागत असल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे हा भिकारी धडधाकट असून त्याने अपंग असल्याचं नाटक करत आहे. हे प्रकरण चार ते पाच युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक प्लान करुन बिचाऱ्या भिकाऱ्याचं पितळ उघड पाडलं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, 'एक तरुण भिकाऱ्याला काहीतरी दान देताना दिसत आहे. या तरुणाने दान देण्याचं सोंग करीत या भिकाऱ्याचा कटोराच पळवला आहे.

आपला कटोरा पळवल्याचं अपंग भिकाऱ्याच्या लक्षात येताच, दुसऱ्या क्षणाला एक अद्भुत प्रकार घडला आहे. त्या अपंग भिकाऱ्याने पैशाने भरलेला कटोरा मिळवण्यासाठी चक्क धावायला सुरुवात केली आहे. हा मजेदार व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'कधी कधी चमत्कार घडतात.' हा व्हिडिओ प्रचंड वेगात व्हायरल होत असून अवघ्या एका तासात हा व्हिडिओ तब्बल 10 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्वीटर वापरकर्त्यांनी आता भन्नाट कमेंट करायला सुरुवात केली आहे. यातील एका वापरकर्त्याने लिहिलं की, 'देवाची कृपा, अपंग व्यक्तीला पर्वत पार करण्याची शक्ती दिली.' असे अनेक व्हिडिओ आता पर्यंत तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले असतील. पण इतक्या मनोरंजानात्मक पद्धतीने पितळ उघडं पाडल्याचा हा पहिलाच व्हिडिओ आहे.

First published:

Tags: Viral video.