मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...आणि पुणे रेल्वे स्टेशनवर लेकीला पाहून ढसाढसा रडू लागला जवान, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

...आणि पुणे रेल्वे स्टेशनवर लेकीला पाहून ढसाढसा रडू लागला जवान, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्टेशनवर जवान आपल्या कुटुंबियांना मिठी मारताना दिसत आहेत. जसे जसे जवान ट्रेनमध्ये चढून जातात, तसं तसं संपूर्ण कुटुंब रडताना दिसत आहे.

    पुणे, 23 जुलै : संपूर्ण देशाचे रक्षण करण्यासाठी जवान सर्व गोष्टींचा त्याग करतात. आपल्या कुटुंबापासून सहा-सहा महिने लांब राहतात. मुलगा, पती, वडील या सर्व नात्यांचा त्याग करत फक्त आणि फक्त देशासाठी हे सैनिक सीमेवर लढत असतात. मात्र मोठ्या सुट्टीनंतर, कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर पुन्हा सीमेवर जाण्यासाठी जेव्हा हा जवान निघतो तेव्हा सर्वांनाच अश्रू अनावर होतात. असाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पुण्याच्या खिडकी रेल्वे स्टेशनवर जवानांना सोडण्यासाठी आलेल्या परिवाराची काय अवस्था होते, दे दाखवणारा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये जवान आपल्या लेकीला मिठी मारून रडताना दिसत आहेत. तर डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू अशा अवस्थेत त्यांना अलविदा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब स्टेशनवर उपस्थित होतं. पीयूष गोयल यांनी यावेळी जवानांचे कौतुक करत, देशाची सेवा आणि रक्षा करण्यासाठी परिवारापासून दूर जातात, अशा सैनिकांना सलाम, असे ट्वीट केले आहे. वाचा-VIDEO: पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये चक्क सायकलवर गस्त घालतोय हा पोलीस अधिकारी वाचा-कडक सॅल्यूट! त्याचा 'काळ' आला होता पण पुणे पोलिसांनी येऊ दिली नाही 'वेळ' व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्टेशनवर जवान आपल्या कुटुंबियांना मिठी मारताना दिसत आहेत. जसे जसे जवान ट्रेनमध्ये चढून जातात, तसं तसं संपूर्ण कुटुंब रडताना दिसत आहे. या व्हिडीओला 1986 मधील कर्मा सिनेमाचे 'ऐ वतन तेरे लीये...' गाणं लावण्यात आले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. वाचा-विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकारानं असा शिकवला धडा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू हा व्हिडीओ पीयूष गोयल यांनी 19 जुलै रोजी शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाख लोकांनी पाहिला आहे. तर, 45 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जवानाला आणि त्यांच्या कुटुंबाला सल्यूट केले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Indian army, Video viral

    पुढील बातम्या