मुंबई १७ नोव्हेंबर : सीमेवर तैनात लष्कराचे जवान ही आपल्या कुटुंबापासून लांब राहून आपल्या देशाचं रक्षण करत असतात. हे जवान तिथे बॉर्डरवर असतात, म्हणून आपण सर्वसामान्य नागरीक सुखाने झोपू शकतो. तसेच सण सेलिब्रेट देखील करु शकतो. हे जवान कित्येक दिवस न झोपता काढतात, तर अनेक वेळा अत्यंत थंड प्रदेशात, म्हणजे अगदी उणे तापमानात देखील दिवसभर-रात्र उभे असतात.
पण असं असलं तरी किती झालं तरी माणूसच ते त्यांना देखील आयुष्यात थोडाफार विरंगुळा हवा आहे. त्यामुळे ते यातुनच कहीतरी मार्ग काढत असतात. तुम्ही सोशल मीडियावर देखील जवानांसंदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असणार. ज्यामध्ये ते अनेकदा मजा करताना आणि आयुष्याचा आनंद लुटताना दिसतात.
हे ही पाहा : टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारने उडवली सगळ्यांची झोप, धडकी भरवणारा Video व्हायरल
सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.
हल्लीच सोशल मीडियावर 'काला चष्मा' गाण्याचा ट्रेंड सुरु होता, ज्यावर लहान मुलांपासून ते अगदी काकूंपर्यंत सगळ्यांनी डान्स केला. हे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात आता जवानांनी देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
भारतीय जवानों ने काला चश्मा गाने पर किया बेहतरीन डांस ❤️🇮🇳👏 pic.twitter.com/oHJ7hWDOP2
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 15, 2022
व्हिडीओमध्ये काही जवान आहे, जे बर्फाळ प्रदेशात आहे आणि अंगाला संपूर्ण झाकून ते काला चष्मा गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि उत्साह इतका मस्त आहे की लोकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे, तर अनेकांना हा व्हिडीओ पाहाच राहावंच वाटत आहे.
हा व्हिडीओ ज़िन्दगी गुलज़ार है ! नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लोकांनी अनेकदा पाहिला आहे. तसेट अनेकांनी या व्हिडीओला लाईक किंवा शेअर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Indian army, Social media, Top trending, Videos viral, Viral