मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'मी काहीच चुकीचं केलं नाही'; Kanpur Gutkha Video मधला 'तो' तरुण भडकला; पाहा VIDEO

'मी काहीच चुकीचं केलं नाही'; Kanpur Gutkha Video मधला 'तो' तरुण भडकला; पाहा VIDEO

कानपूर स्टेडिअममध्ये गुटखा खाताना दिसलेला तो तरुण सर्वांसमोर आला.

कानपूर स्टेडिअममध्ये गुटखा खाताना दिसलेला तो तरुण सर्वांसमोर आला.

कानपूर स्टेडिअममध्ये गुटखा खाताना दिसलेला तो तरुण सर्वांसमोर आला.

  • Published by:  Priya Lad

कानपूर, 27 नोव्हेंबर : कानपूरमध्ये भारत-न्यूझीलँड (IND vs NZ) टेस्ट मॅचदरम्यान चर्चेत (Kanpur Stadium Viral Video) आला तो ही मॅच पाहण्यासाठी आलेला एक तरुण. तोंडात गुटखा (Kamla Pasand Viral Video) भरून हटके स्टाइलने फोनवर बोलणारा हा तरुण कॅमेऱ्यात कैद झाला आणि ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video of Kanpur). कानपूर गुटख्यासाठीही ओळखलं जातं (Kanpuriya Videos). त्यामुळे कानपूरमधून असा व्हिडीओ समोर येताच त्यावर बऱ्याच मीम्स झाल्या, कमेंट येऊ लागल्या (Kanpur Funny Video). दरम्यान त्या तरुणाने आपण काहीच चुकीचं केलं नाही असं म्हटलं आहे.

कानपूरमध्ये गुटख्याचे कारखाने आहेत (Kanpur Gutkha Video). इथले लोकही आवडीने गुटखा खातात. इतकंच नव्हे तर तोंडात ते गुटखा चघळतानाही दिसतं म्हणजे थुंकी आली तरी ते थुकत नाही. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एक व्यक्ती स्टेडिअममध्ये बसलेली आहे. जी फोनवर स्टाइलमध्ये बोलता बोलता गुटखा चघळते आहे.

स्टेडिअममध्ये असं गुटखा खाण्यास बंदी आहे.   हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ही व्यक्ती गुटख्याच्या ब्रँडची जाहिरात करत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तसंच त्याच्या शेजारी असलेल्या तरुणीवरूनही कमेंट येऊ लागल्या.

हे वाचा - अजबच! म्हणे, 'हाच माझा नवरा'; आजीबाईने चक्क गाईशीच बांधली लग्नगाठ कारण...

दरम्यान या सर्व कमेंट आणि मीम्स पाहिल्यानंतर हा तरुण सर्वांसमोर आला आहे आणि नेमकं सत्य काय आहे ते सांगितलं आहे.

शोभित पांडे असं या व्यक्तीचं नाव आहे. न्यूज 18 शी बोलताना त्याने सांगितलं, मी कोणतीही ब्रँडिग केलेली नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही. माझ्या तोंडात गोड सुपारी होती. माझ्याकडे गुटखा नव्हताच. गेटवर एन्ट्री झाली तिथंच माझ्याजवळ असलेला पान मसाला मला बाहेर काढायला लावला.  मी तसं काहीचं चुकीचं केलं नाही. तरी लोकांना वाटत असेल माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो.

हे वाचा - 'बाबा दारू पितात, पुस्तकाला पैसे देत नाही'; चिमुकल्याने रडत सांगितली व्यथा,VIDEO

माझा एक मित्र गेट नंबर आठला होता आणि मी अकरामध्ये होतो. त्याला माझ्याकडे यायचं होतं त्याला मी गेट नंबर अकराला बोलवलं. फक्त दहा सेकंदाचा हा फोन होता. बोलायचं होतं तोंडात थुंकी होती. तिथं ती मला थुंकताही आली नाही, तसं मी करू शकत नव्हतो.

जितक्या मीम्स बनले, कमेंट मी वाचले आहेत. काही कमेंट खूप घाणेरड्या होत्या. माझ्या शेजारी माझी बहीण बसली होती. पण लोकांना नको त्या कमेंट केल्या आहेत. त्याचाच मला त्रास होतोय.

First published:

Tags: Kanpur, Viral, Viral videos