• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भारतातील असं गाव जिथे नवरदेवाचा ड्रेस घालते नवरी; लग्नात होते कपड्यांची अदला-बदली, रंजक आहे यामागचं कारण

भारतातील असं गाव जिथे नवरदेवाचा ड्रेस घालते नवरी; लग्नात होते कपड्यांची अदला-बदली, रंजक आहे यामागचं कारण

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

लग्नात नवरदेव (Groom) केवळ नवरीचे (Bride) कपडेच घालत नाही तर तो मुलीप्रमाणेच सजतोही. यासाठी त्याला ज्वेलरी आणि इतर मेकअपही करावा लागतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 17 ऑगस्ट : लग्नासाठी (Marriage) प्रत्येकजण खास तयारी करत असतो आणि नवरी - नवरदेव (Bride and Groom) तर महागाचे कपडे विकत घेत असतात. मात्र, तुम्ही कधी लग्नात नवरदेवानं लेहंगा आणि नवरीनं शेरवानी घातलेलं पाहिलंय का? मात्र, नवरदेवाचा ड्रेस (Groom Dress) नवरीनं घालण्याची परंपरा भारतातीलच एका भागात आहे. आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील गन्नामनी समुदायातील लोक या अनोख्या प्रथेचं पालन करतात. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ही परंपरा आजची नाही तर काकतीय राज्यकर्त्यांच्या काळापासून चालत आली आहे. लग्नाच्या एक दिवस आधी वधूला वराचे कपडे घालावे लागतात आणि वराला मुलीप्रमाणे वेशभूषा करून साडी किंवा लेहंगा परिधान करावा लागतो. ही परंपरा जरी विचित्र असली तरी गन्नमनीचे लोक पूर्ण उत्साहाने त्याचे पालन करत आले आहेत. अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral या प्रथेच्या माध्यमातून मुलगी आणि मुलगा यांच्यातील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. सोबतच आपल्या देशातील विविधतेचंही हे एक अनोखं उदाहरण आहे. लग्नात नवरदेव केवळ नवरीचे कपडेच घालत नाही तर तो मुलीप्रमाणेच सजतोही. यासाठी त्याला ज्वेलरी आणि इतर मेकअपही करावा लागतो. नवरीदेखील याच पद्धतीनं पॅन्ट शर्ट किंवा कुर्त्यामध्ये लग्नसमारंभात सहभागी होते. यासोबतच नवरी हेअरस्टाईलदेखील मुलांप्रमाणेच करते. सोबतच मुलांप्रमाणे चष्माही घातला जातो. काकतीया साम्राज्याची महाराणी रुद्रमा देवी यांच्यापासूनच ही परंपरा सुरू झालेली. त्यांचे सेनापती गन्नामनी कुटुंबातून होते. महाराणीनं 1263 पासून 1289 पर्यंत साम्राज्याची सत्ता सांभाळली. या परंपरेचा उद्देश पुरुषांची प्रतिमा दुनियेसमोर अधिक चांगल्या पद्धतीनं मांडणं, हा होता. आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करुन विचारले सवाल; माहिती आहे का उत्तर? युद्धाच्या दरम्यान शेकडो सैनिकांचा जीव गेला. यानंतर असा निर्णय घेण्यात आला की महिला पुरुषांचे कपडे घालून युद्ध लढतील. यानंतर या निर्णयाचा फायदा झाला आणि काकतिया साम्राज्याला अनेक लढायांमध्ये याचा फायदा झाला. सोबतच गन्नामनी कुटुंबांमध्येही लग्नामध्ये कपड्यांच्या अदला बदलीची ही परंपरा सुरू झाली. याचं आजपर्यंत पालन केलं जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: