मध्य प्रदेश, 10 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) तसे अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतात. सध्या सागरमधील (Sagar) बडा बाजारमधील एक महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केली आहे. दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू आहे. या सर्व घटनेनंतर दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
महिलेने पतीला भररस्त्यात त्याच्या दुकानासमोर येऊन मारहाण केली आहे. महिलेने चप्पल हातात घेऊन त्याची धुलाई केली. (In the market a woman slapped her husband video viral)
या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणात मोती नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी नवल आर्या यांनी सांगितलं की, पती -पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
हे ही वाचा-किळसवाणा प्रकार! सिरिंजमध्ये स्पर्म भरून भर दुकानासमोर महिलेच्या कमरेवर टोचलं
आज त्यांना कोर्टात हजर राहायचे होते. दरम्यान दोघांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. यानंतर पत्नीने चप्पल घेऊन त्याला मारहाण सुरू केली. या घटनेनंतर दोघेही पोलीस ठाण्यात पोहोचले. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video., Wife and husband