मुंबई, 15 फेब्रुवारी : नवरदेव वरात घेऊन लग्नमंडपात आला की त्याचं स्वागत केलं जातं. त्याला ओवाळलं जातं, त्याची नजर काढली जाते, त्याला मिठाई भरवली जाते. पण एका नवरदेवाचं असं स्वागत करण्यात आलं आहे की लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. लग्नात नवरदेवाच्या अशा स्वागताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नवरदेवाचं स्वागत चक्क सिगारेटने करण्यात आलं आहे. त्याचे होणारे सासू-सासरे म्हणजे नवरीबाईच्या आईवडिलांनीच त्याला सिगारेट दिली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरदेव एका खुर्चीत बसला आहे. त्याच्यासमोर त्याचे सासू-सासरे आहेत. सासू नवरदेवाच्या तोंडात सिगारेट देते आणि सासरा माचिसने ती सिगारेट पेटवतो. नवरदेव एक कश घेतल्यासारखं करतो आणि नंतर सिगारेट तोंडातून बाहेर काढतो.
हे वाचा - VIDEO - नवरी राहिली बाजूलाच, नवरदेवाला घेऊन घोडीच झाली फरार; पाहा लग्नाची अजब वरात
ब्लॉगर जुही पटेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्ट करताना तिने सांगितलं, लग्नाची एक नवी परंपरा पाहायला मिळाली. ज्यात सासू आपल्या जावयाचं स्वागत मिठाई, विडी आणि पान देऊन करते. दक्षिण गुजरातच्या काही गावात अशी परंपरा आहे. हे फक्त एक परंपरा म्हणून केलं गेलं आहे. नवरदेवाने सिगारेट ओढलेली नाही, ना सासऱ्याने ती पेटवली आहे.
माहितीनुसार तशी ही प्रथा जुनी आहे. म्हणजे आधी विडी देऊन स्वागत व्हाययचं पण आता विडीची जागा सिगारेटने घेतली आहे.लग्नाशी संबंधित अशा बऱ्याच प्रथा, परंपरा आहेत, ज्या इतरांना विचित्र वाटतात. काही ठिकाणी खास ड्रिंक पाजली, जाते काही ठिकाणी पानही भरवलं जातं.
हे वाचा - अरे देवा! आता लग्न कर म्हणणंही धोक्याचं; लग्नाचा तगादा लावणाऱ्यांनाच विचित्र आजार
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने बिहारमध्येही पान आणि सिगारेटने नवरदेवाचं स्वागत केलं जातं.
View this post on Instagram
तुमचं या परंपरेबाबत काय म्हणणं आहे, तुम्ही अशी परंपरा पाहिली आहे का? किंवा अशा काही विचित्र परंपरेबाबत तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Cigarette, Smoking, Viral, Viral videos, Wedding, Wedding video