या काश्मिरी तरुणानं घोड्यावर स्वार होत भर बर्फात केलं कर्तव्य, बघा व्हायरल VIDEO

या काश्मिरी तरुणानं घोड्यावर स्वार होत भर बर्फात केलं कर्तव्य, बघा व्हायरल VIDEO

माणुसकीची भावना मनात असेल तर काहीही शक्य होऊ शकतं. काश्मीरमधल्या एका तरुणानं हेच सिद्ध केलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 17 जानेवारी : काश्मीर (Kashmir) म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं जातं. सध्या मात्र काश्मीरमध्ये मोठीच बर्फवृष्टी (snow fall) होत आहे. यातून स्थानिक जनजीवन आणि दळवणवळणाला मोठा फटका बसला आहे.

यादरम्यान बरेच लोक आपलं गरजेचं सामान मागवण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट्सचा (online websites) आधार घेत आहेत. काश्मीर खोऱ्यात मोठ्या बर्फवृष्टीनंतर बर्फ जमा झाल्यानं लोकांच्या घरापर्यंत सामान पोचवणं मोठंच अवघड होऊन बसलं. त्यावेळी 'अमेझॉन'या (amazon) वेबसाईटच्या डिलिव्हरी बॉयनं (delivery boy) जे केलं ते कमालीचं सुंदर आणि माणुसकीचं दर्शन घडवणारं आहे. या मुलाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगानं व्हायरल (video viral) होतो आहे.

'आज तक'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 22 वर्षांचा डिलिव्हरी बॉय शिराज अली खान या कथेचा हीरो आहे. याचं काम आहे लोकांच्या घरापर्यंत गरजेचं सामान पोहोचवणं. मात्र सगळीकडं बर्फ़ाचे थर साचल्यानं त्याला ड्युटी करणं अशक्य होऊन बसलं. मात्र अनेकांना पार्सल (parcel) मिळण्याची निकड आहे, काही लोक अडचणीत आले आहेत हे त्याला जाणवत होतं. मग त्यानं एक निर्णय घेतला.

शिराज घोड्यावर स्वार झाला. याच घोड्यावर रपेट करत त्यानं लोकांचे पार्सल भर बर्फवृष्टीत दारापर्यंत नेऊन दिले. तो सांगतो, 'मला सतत ग्राहकांचे फोन येत होते. अनेक पार्सल्समध्ये लहान मुलांचं अन्न, कशात अभ्यासाची पुस्तकं असं काय काय होतं. बाईकवर तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं. कारण रस्त्यांवर बर्फ पडला होता. मग मी घोड्यावर स्वार होत हे काम करायचं ठरवलं. माझ्या सीनियरशी बोलून, सर्व सुरक्षा परवानग्या मिळवत मी हे केलं.

शिराजला घोडेस्वारी (horse riding) खूप आवडते. त्यानं काही महिन्यांपूर्वीच घोडा विकत घेतला. सध्या बीएच्या शेवटच्या वर्षात तो शिकतो आहे. मित्रांसोबत तो दर वीकेंडला घोडेस्वारीचा आनंद घेत असतो.

Published by: News18 Desk
First published: January 17, 2021, 11:03 AM IST

ताज्या बातम्या