कानपूर, 27 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, अद्याप कोरोनावर कोणताही लस मिळालेली नाही आहे. सर्व देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. मात्र अद्याप एकाही देशाला कोरोनावर लस तयार करण्यात यश आलेले नाही आहे. त्यामुळे सध्या लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास, दंडात्मक कारवाईही केली जात आहे. मात्र उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक वेगळाच प्रकार घडला. कानपूर पोलिसांनी चक्क बकरीला अटक केली आहे.
वाचा-फुटबॉल, लुंगी आणि सराव! तरुणांचा जबरदस्त VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल;'एक नंबर'
हा अजब प्रकार कानपूरमधील बेकनगंज परिसरात घडला. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी अचानक रस्त्यात एक बकरी आढळली. मास्क न घालता फिरत असल्यामुळे पोलिसांनी या बकरीला जीपमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. जेव्हा बकरीच्या मालकाला या घटनेबाबत कळले, तेव्हा तो बकरीला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचला. अनेक विनवण्या केल्यानंतर अखेर पोलिसांनी बकरीला मालकाच्या ताब्यात दिले. मात्र पुन्हा रस्त्यावर प्राणी फिरता कामा नये, अशी ताकीदही दिली.
वाचा-165 कोटींची लॉटरी लागल्यावरही निभावली मैत्री, मित्राला केला फोन आणि...
दरम्यान, हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांची मस्करी करण्यात सुरुवात केली. त्यावेळी खरा प्रकार समोर आला. IANSने दिलेल्या माहितीनुसार अनवारगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी शैफुद्दीन बेग यांनी सांगितले की, त्यांनी एका तरुणाला पाहिलं, जो मास्क न घालता बकरीला फिरवत होता. पोलिसांना पाहिल्यानंतर तो तरुण पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी जीपमधून बकरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.