मुंबई, 17 डिसेंबर : 'लाच घेणे आणि लाच देणे' हा कायद्याने गुन्हा आहे. पण, तरीही काही महाभाग लाचखोरी करण्याचे सोडत नाही. वाहतूक पोलिसांना लाच घेताना अनेक वेळा रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आता तर एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा (Female traffic police constable) लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
घडलेली हकीकत अशी की, एका रस्त्यावर स्कुरवरून विना हेल्मेट जाणाऱ्या एक तरुणीला महिला वाहतूक पोलिसांनी रोखले होते. त्यांच्याकडे रितसर चौकशी करण्यात आली आणि दंडही सांगण्यात आला. या तरुणीने हेल्मेट न घातल्यामुळे महिला वाहतूक पोलिसाने कारवाई केली होती. पण, पावती न फाडता 'काही तरी घ्या' असं म्हणून सुटण्याचा प्रयत्न या तरुणीने केला.
या तरुणीने महिला वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलला लाच देण्याचा प्रयत्न केला. नंतर हो ना ही म्हणत अखेर महिला कॉन्स्टेबलने तयारी दाखवली. पण, भर रस्त्यावर पैसे कसे घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलने मोठ्या शिताफीने इकडे तिकडे पाहिले आणि तरुणीला पैसे देण्यासाठी बोलावलं. त्यानंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याने इकडे तिकडे पाहिले आणि तिला इशारा केला, त्यानंतर त्या तरुणीने पैसे थेट महिलेच्या पॅन्टच्या मागील खिश्यातच कोंबले. मोहिम फत्ते झाली या थाटात तरुणी आपल्या स्कुटरकडे परतली आणि निघून गेली.
खांद्यावर हात टाकून चालले होते 2 मित्र, अंगावर पिलरचा भाग कोसळला अन्...
आता हा सगळा प्रकार समोरील इमारतीच्या गॅलरीत उभ्या असलेल्या तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, याची पुष्टी न्यूज 18 लोकमतने केली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुण्यातला असल्याचे सांगितला जात आहे. पण, याबद्दल असे वृत्त अद्याप समोर आले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.