मिसौरी, 25 मे : सारं जग सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं सामाजिक अंतर (Social Distancing) पाळण्याचे आवाहन करूनही अद्यापही लोकं या परिस्थितीला गांभीर्यानं घेत नाही आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत न्यूड पूल पार्टी करणाऱ्या तरूणांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या पार्टीमध्ये तब्बल 11 हजार एकत्र जमल्याची माहिती आहे.
हा व्हिडीओ अमेरिकेतील सेंट्रल मिसौरी (Missouri) येथील आहे. येथील जगप्रसिद्ध लेक ऑफ द ओज़ार्कमध्ये (Lake of the Ozarks) लोकं मास्कचा वापर न करता पूल पार्टी करताना दिसत आहे. एक मीटरचं अंतर तर सोडा इथं लोकं एकमेकांना मिठ्या मारताना दिसत आहेत. काय रोमान्स करत आहेत तर काही फोटो काढण्यात व्यस्त आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुण-तरुणींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाचा-लॉकडाऊनमध्ये केस कापायला गेले अन् 140 जण कोरोना पॉझिटिव्ह होऊन आले
No covid concerns at the lake of the ozarks😳 #loto pic.twitter.com/Yrb4UNM64u
— Scott Pasmore (@scottpasmoretv) May 24, 2020
वाचा-लॉकडाऊनमध्ये रोमॅण्टिक झाला हार्दिक, गर्लफ्रेण्डला KISS करतानाचा फोटो केला शेअर
दरम्यान, ज्या शहरात या पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथंच जवळजवळ 12 हजारहून कोरोना रुग्ण आहेत. तर, 676 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही यांना पार्टीचे आयोजन करण्याची परवानगी कोणी दिली, याचा तपास करण्यात येणार आहे.
वाचा-कोरोनामुळे 70 वर्षांनंतर झाली ताटातूट, अखेर अशी झाली भेट! हा VIDEO पाहाच