मराठी बातम्या /बातम्या /Viral /

IIT दिल्लीला डॉग हँडलर हवाय! शिक्षण Btech, 45000 पगार; जाहिरात पाहून उमेदवारही हबकले

IIT दिल्लीला डॉग हँडलर हवाय! शिक्षण Btech, 45000 पगार; जाहिरात पाहून उमेदवारही हबकले

IIT दिल्लीची ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. डॉग हँडरलसाठी शिक्षणाची अपेक्षा पाहून सोशल मीडियावर त्याची मजा घेतली जात आहे.

    नवी दिल्‍ली, 6 सप्टेंबर : कोरोना व्हायरस महासाथीमुळे जगभरातील नोकऱ्यांवर संकट उभं ठाकलं आहे. यादरम्यान दिल्लीतील इंडियन इंस्‍टीट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (IIT Delhi) ने नोकरीसाठी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात समोर येताच खूप व्हायरल होत आहे. ही जाहीरात व्हायरल होण्यामागे याची पोस्ट, पगार आणि अपेक्षा कारणीभूत आहे. आता ही जाहीरात सोशल मीडियावर शेअर करीत लोक मजा घेत आहेत. IIT दिल्लीने एक जाहिरात काढली आहे. या जाहिरातीत परिसरातील कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी (डॉग हँडलर)  नोकरीसाठी जागा निघाली आहे. आयआयटीने काढलेल्या या जाहिरातीत सांगण्यात आले आहे की डॉग हँडलरची जागा ऑफिसमध्ये आहे. येथील नोकरी कॉन्ट्रक्टवर राहिल, मात्र या जाहिरातीचे आकर्षण म्हणजे पगार आणि शिक्षण आहे. जाहिरातीत दिल्याप्रमाणे डॉग हँडरलला प्रति महिना 45000 रुपये वेतन दिलं जाईल, काही रिपोर्टनुसार दिल्ली पोलिसात या नोकरीसाठी 20000 रुपये दिले जाते. म्हणजे आयआयटी दिल्ली दुप्पट वेतन देत आहे. याशिवाय शिक्षणासंबंधित योग्यतेनुसार उमेदवाराचे शिक्षण BA, BSC, Bcom, Btec यापैकी एक कोर्स झालेला असणे अनिवार्य आहे. यापुढे जाहिरातीत म्हटले आहे की, जो कोणी ही नोकरी करेल त्याच्याजवळ कार असणे गरजेचे आहे. आयआयटीनुसार कुत्र्याला डॉक्टर वा क्लीनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी डॉग हँडलरजवळ कार असणे गरजेचे आहे. आयआयटीला यासाठी 21 ते 35 वर्षांपर्यंतची व्यक्ती नोकरीसाठी हवी आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या