Home /News /viral /

Optical Illusion: या झाडात लपलंय घुबड, 30 सेकंदात शोधल्यास तुम्ही ठरणार स्मार्ट

Optical Illusion: या झाडात लपलंय घुबड, 30 सेकंदात शोधल्यास तुम्ही ठरणार स्मार्ट

आपण सगळे सोशल मीडिया (Social Media) वापरतो आणि दिवसातील बराचसा वेळ विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काही काम नसेल किंवा बोअर होत असेल तर आपण हातात फोन घेतो आणि सोशल मीडियावर सर्फिंग करत बसतो.

    मुंबई, 15 जून-  आपण सगळे सोशल मीडिया (Social Media) वापरतो आणि दिवसातील बराचसा वेळ विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काही काम नसेल किंवा बोअर होत असेल तर आपण हातात फोन घेतो आणि सोशल मीडियावर सर्फिंग करत बसतो. अलीकडे सोशल मीडिया हा वेळ घालवण्यासाठी मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी उपलब्ध असतात. माहिती देणाऱ्यांपासून ते अगदी मनोरंजन करणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असतात. विविध प्रकारच्या गंमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् (Tricky Viral Photo), रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न, गेम (Games), क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोंची खूप चर्चा असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. या फोटोत एक घुबड (Owl) लपलंय आणि ते तुम्हाला 30 सेकंदात शोधायचं आहे. अनेक नेटकरी या फोटोत घुबड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या फोटोत एका झाडाचं खोड दिसतंय. त्या खोडाला फांद्या आहेत. त्या फांद्यांना पालवी फुटल्याचंही दिसतंय. याच खोडामध्ये लपलंय ते एक घुबड. या खोडावर लपलेलं घुबड तुम्हाला नीट बघून शोधायचंय. ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोने नेटकऱ्यांना गोंधळात टाकलंय. नीट पाहिलं तर घुबड दिसतंय पुन्हा पाहिलं की तिथे फक्त झाडाचं खोड दिसतंय, त्यामुळे तिथे नक्की घुबड आहे की नाही, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. या संदर्भात जागरण जोशने वृत्त दिलंय. (हे वाचा: गायीनं शिंगावर उचलून जमिनीवर आपटलं; हल्ल्यात वृद्धाची झाली भयंकर अवस्था, VIDEO) या झाडाच्या खोडावर छोट्या फांद्या दिसत आहेत. त्यात थेट समोरच्या फांदीकडे नीट पाहिलं तर तुम्हाला तिथे अगदी खोडासारख्याच रंगात असलेलं घुबड दिसेल. त्या फांदीवर ते बसलं असून खोडावरील आकारात त्याचं शरीर दिसतंय. एक-दोनदा पाहून तुम्हाला ते लगेच दिसणार नाही. तुम्हाला अगदी लक्ष केंद्रीत करून बघावं लागेल, त्यानंतर त्या खोडावरील घुबड तुम्हाला दिसेल. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो किंवा चित्र हे आपल्याया गोंधळात टाकणारे असतात. असं म्हणतात की, जेव्हा आपले डोळे आपल्या मेंदूला माहिती पाठवतात, तेव्हा एखादी वास्तविकतेशी जुळत नसलेली गोष्ट समजून घेताना डोळे मेंदूला फसवतात. त्यामुळे याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. "illusion" हा शब्द लॅटिन शब्द illudere पासून आला असून त्याचा अर्थ "मस्करी करणं" असा होतो. त्यामुळे तुम्हीही या इल्युजनमधून घुबड शोधा.
    First published:

    Tags: Photo viral, Viral

    पुढील बातम्या