मुंबई, 17 जुलै : मला पंख असते तर हा काल्पनिक निबंध आपल्यापैकी बहुतेकांनी शाळेत लिहिलाच आहे. पण पक्ष्यांना (bird) हात असते तर... असा विचार कधी केला आहे का? आता तसा विचार करणं सोडा, पक्ष्यांना हात (bird with hand) असते तर त्यांनी काय काय केलं असतं, हे प्रत्यक्षच पाहा. हातवाल्या पक्ष्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (socia media viral video) होतो आहे.
सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक जण आपल्यातील कलागुणांना वाव देत आहेत. एक एक जण अशा भन्नाट आयडिया शोधत आहे ना की आपण त्याची कल्पनाही कधी केली नसेल. त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांना हात असते तर त्यांनी काय काय केलं असतं, हे दाखवणारा हा व्हिडीओ.
पक्ष्याला माणसाचे हात असल्याचा हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये पक्षी वेगवेगळ्या कृती करताना दिसत आहेत. कावळ्याने आपल्या डोक्यावर दोन्ही हात घेतले. काही पक्षी पाण्यात कपडे-भांडी धुत आहेत. एक गिटार वाजवतोय तर एक सेल्फी स्टिकने छानशी पोझ देऊन आपला सेल्फी काढतो आहे. एक पक्षी छान दोन्ही हात वर करून पळत आहे. काही पुस्तक वाचत आहे, जिम करत आहे. एक पक्षी एक एका हातात ट्रॉली आणि एका हाता मोबाइल घेऊन शॉपिंग करतो आहे आणि विशेष म्हणजे हातात मोबाइल, डायरी, छत्री घेऊन अगदी रूबाबात चालणारे पेंग्विन तर खूपच भारी वाटत आहेत.
एकंदरच काय तर पक्ष्यांना दोन हात असते तर माणसांना जे शक्य आहे, ते सर्व करू शकले असते.
हे वाचा - OMG! पक्ष्याची हिंमत तर पाहा शार्कसारख्या भल्या मोठ्या माशालाच घेऊन उडाला; VIDEO VIRAL
CurlyKidlife या फेसबुक पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हा व्हिडीओ पाहून हसू आलं. याशिवाय हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने बनवला त्या व्यक्तीच्या मेहनतीलादेखील सर्वांनी दाद दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.