दगड नव्हे तर हा आहे एक प्राणी; तुम्ही याला ओळखलंत का?

दगड नव्हे तर हा आहे एक प्राणी; तुम्ही याला ओळखलंत का?

बहुतेक नेटिझन्सनी या प्राण्याला ओळखलं आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरात आपल्या कुटुंबातील सदस्यांसह किंवा ऑनलाइन आपल्या मित्रपरिवारासह गेम खेळत आहेत. सध्या सोशल मीडियावरदेखील असेच काही गेम व्हायरल होत आहेत. एखादा युझर एखादा फोटो सोशल मीडियावर (social media viral photo) टाकतो आणि त्या फोटोत काहीतरी शोधण्याचं किंवा तो फोटो काय आहे हे ओळखण्याचं चॅलेंज देतो. काही दिवसांपूर्वी आपणदेखील असे बरेच गेम खेळलोत ज्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशाचा काही फोटोंमधील एखादा प्राणी शोधण्याचं चॅलेंज आम्ही तुम्हाला दिलं होतं. आता तुमच्यासाठी आणखी एक चॅलेंज ज्यामध्ये फोटोत तुम्हाला प्राणी शोधायचा नाही तर हा फोटो एका प्राण्याचा आहे, हा प्राणी कोण ते ओळखायचं आहे.

आयएएस अधिकारी डॉ. जेके सोनी यांनी आपल्या ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी नेटिझन्सना हा प्राणी नेमका कोण आहे ते ओळखण्याचं आव्हान दिलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सुरुवाताली एखादा दगडच वाटतो. मात्र नीट पाहिला तर हा प्राणी नक्कीच ओळखू येईल.

सोनी यांनी दिलेलं हे आव्हान अनेक ट्विटर युझर्सनी स्वीकारलं. त्यांनी हा प्राणी नेमका कोण आहे ते ओळखण्याचा प्रयत्न केली. त्यापैकी बहुतेकांनी या प्राण्याला ओळखलं आहे. तुम्हीही त्याला ओळखलं असेलच. बरोबर हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर ही एक मगर (crocodile) आहे.

सोनी यांनी या गेममध्ये सहभागी झालेल्या सर्व नेटिझन्सचे आभार मानले आणि त्यांनी हा प्राणी कोण आहे तेदेखील सांगितलं. हा एका मगरीचा क्रॉप केलेला फोटो आहे. यानंतर त्यांनी या मगरीचा पूर्ण फोटोही टाकलेला आहे.

हे वाचा - इथं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या

तुम्हीदेखील हा फोटो लवकर ओळखू शकणार नसाल तर मग तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांनादेखील ही बातमी शेअर करा आणि त्यांना हा फोटो कुणाचा आहे, ते ओळखण्याचं चॅलेंज द्या.

संपादन - प्रिया लाड

First published: July 3, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading