Home /News /viral /

मुलं अधिकारी पदावर आणि माय रस्त्यावर...IAS अधिकाऱ्यानं शेअर केला भावुक करणारा PHOTO

मुलं अधिकारी पदावर आणि माय रस्त्यावर...IAS अधिकाऱ्यानं शेअर केला भावुक करणारा PHOTO

IAS अधिकारी अविनाश शरण यांनी 21 ऑगस्टला एका सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट : गरज सरो वैद्य मरो तसं अनेक ठिकाणी मुलं नोकरीला लागली की आई-वडिलांना विसरतात किंवा त्यांची अडचण होऊ लागते. अशावेळी त्यांना घराबाहेर काढलं जातं. बऱ्याचदा एकूण परिस्थिती पाहून आई-वडीलच घरही सोडतात. कोरोनाच्या काळात मात्र अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडताना पाहायला मिळालं. एकमेकांना मदत करणारे आणि माणुसकी जपणाऱ्या अनेक घटना समोर आल्या असतानाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी 21 ऑगस्टला एका सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये या फोटोवरचं कॅप्शन वाचून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाहीत. या आईचा एक मुलगा अधिकारी तर दुसरा नेता नात अधिकारी आणि तरीही या माऊलीला छप्पर नाही. सोशल मीडियावर या माऊलीचा फोटो खूप व्हायरल होत आहे. असं कॅप्शन अधिकारी अवनाश शरण यांनी दिलं आहे. हे वाचा-हा तर कहरच! चोरट्यांनी कोरोना रुग्णाचंही लुटलं घर, चोरलेला ऐवज पाहून बसेल धक्का हा फोटो व्हायरल झाल्या नंतर काही युझर्सनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला तर एका युझरनं या महिलेची मुलं दूर राहात असल्यानं त्यांनी देखरेखीसाठी एक केअरटेकर ठेवली होती मात्र तिने नीट काळजी न घेतल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या महिलेची नीट काळजी घेतली नाही आणि त्यामुळे तिची प्रकृती खालवली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा दावा अनेक युझर्सनी केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral photo

    पुढील बातम्या