मुंबई, 16 मे : मेरे पास माँ है... हा फिल्ममधील डायलॉग तुम्हाला माहितीच आहे. आईबाबत अशी बरीच वाक्ये, लेख तुम्ही वाचली असतील. सध्या सोशल मीडियावर आईबाबत अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने ही पोस्ट शेअर केली आहेत. ज्यात या अधिकाऱ्याने आईबाबत असं काही सांगितलं की ते बहुतेक सर्वांनाच पटलं आहे. आईबाबतची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे
(IAS Officer post about mother).
IAS अर्पित वर्मा यांनी आईबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी आईबाबत काही सांगितलं आहे. एका पानावर सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली ही पोस्ट आहे. जी प्रत्येकाच्या हृदयाला भिडली आहे. अशी आई असलेली आपली ही शेवटची पिढी आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अर्पित वर्मा आईबाबत असं का म्हणत आहेत, ते पाहुयात.
जी पोस्ट अर्पित यांनी केली आहे, त्यात म्हटलं आहे.
'आम्ही ती शेवटची पिढी आहोत, जिच्याकडे अशी निरागस आई आहे जिचं...
ना कोणत्या सोशल मीडियावर अकाऊंट आहे.
ना फोटो, ना सेल्फी घेण्याची हौस आहे.
स्मार्टफोनचा लॉक कसा उघडतो हेसुद्धा तिला माहिती नाही.
जिला आपली जन्मतिथी माहिती नाही.
जिनं खूप कमी सुविधांमध्ये आपलं आयुष्य काढलं, कोणत्याही तक्रारीशिवाय,
हो, आम्ही ती शेवटची पिढी आहोत जिच्याकडे अशी आई आहे.'
तसं आईबाबत बोलावं लिहावं तितकं कमी. पण ही पोस्ट खास आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या आईची आठवण आली आहे.
हे वाचा - आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्ध महिलेचा जबरदस्त Skipping rope Video
यावर बऱ्याच जणांनी कमेंट केली आहे. बहुतेक युझर्सना हे पटलं आहे. आईचा निरागसपणा स्मार्टफोनने हिरावून घेतला आहे. आईचा निरागसपणा भावी पिढीला समजणारच नाही. अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत. तुमची प्रतिक्रिया काय आहे, ही आमच्या आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.