Home /News /viral /

करीना कपूरसारखी सावत्र आई हवी म्हणत ढसाढसा रडू लागली चिमुकली, बाबांकडे केला भलताच हट्ट; पाहा VIDEO

करीना कपूरसारखी सावत्र आई हवी म्हणत ढसाढसा रडू लागली चिमुकली, बाबांकडे केला भलताच हट्ट; पाहा VIDEO

सावत्र आईसाठी रडणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 06 सप्टेंबर : लहान मुलं (Children video) कधी काय करतील, कधी काय बोलतील आणि कधी काय मागतील याचा नेम नाही. खाऊ, खेळणीसाठी ते कधी, कुठे हट्ट करतील सांगू शकत नाही (Kids video). पण कधी कोणत्या मुलाला सावत्र आईसाठी (Little girl crying for stepmother) हट्ट करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर (Child funny video) असा हट्ट करणाऱ्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लहान मुलं आपल्या आईशिवाय राहत नाही हे आपल्याला माहितीच आहे. बाबा, आजी, आजोबा असले तरी त्यांना आई ही आपल्यासोबत हवीच असते. आपल्या आईची जागा ते कुणालाच देत नाही. पण या चिमुकलीला मात्र आपल्या आईऐवजी सावत्र आई हवी आहे. तिने आपल्या बाबांकडे सावत्र आईसाठीच हट्ट केला.  चक्क आपल्याला करीना कपूरसारखी आई हवी असंच सांगतिलं. बर्फी टीव्ही नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता चिमुकली आपल्या बाबांना आपल्याला सावत्र आई हवी आहे असं सांगतं. हे वाचा - मुलीच्या वाढदिवसादिवशीच सावत्र आईचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून भडकले नेटकरी तिचे वडील विचारतात की सावत्र आई कुठे मिळते, सांग. ती सांगते फोन करा ती येईल. तिला बाजारात जाऊन घेऊन या. मग तिला वडील विचारतात की तुला कशी सावत्र आई हवी आहे. करीश्मासारखी, करीनासारखी. मग ती सांगते आपल्याला करीना कपूरसारखी सावत्र आई हवी. त्यानंतर ते तिला तुझी आई नको का असं विचारतात. तिचे वडील तिला आई तुझ्यावर खूप प्रेम करते, सावत्र आई मिळाली तर तुला तुझी आई नको का? तिची तुला आठवण येणार नाही का? असं विचारतात. तेव्हा ती सांगते मला माझ्या आईची आठवण येणार. पण ती मला रागाने सोडून गेली. मग तिचे वडील तिला आपण तिला मनवून आणू आपल्याला सावत्र आई नको असं सांगतात. आईबाबत तिच्या मनात जो राग आहे तो दूर कऱण्याचा आणि ती तुझ्यावर किती प्रेम करते हे पटवून देतात. चिमुकलीसुद्धा आपल्या आईवर रागावली आहे पण ती आपल्या आईशिवाय राहू शकत नाही तिला तिची आई हवी आहे, हे तिच्या बोलण्यातून दिसून येतं. आपल्या आईला परत आणण्यासाठी ती तयार होते. हे वाचा - नवरीच्या सरप्राइझचा वाजवला बँड! रिसेप्शनमध्ये भावंडांचा प्रताप पाहून झाली शॉक मुलगी इतकी लहान आहे की काय बोलते आहे तिला समजत नाही. पण तिचं तिच्या आईवरील प्रेमही दिसून येते. तिचा निरागसपणा पाहून आपल्या चेहऱ्यावर मात्र थोडं हसू येतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Funny video, Parents and child, Small child, Viral, Viral videos

    पुढील बातम्या