Home /News /viral /

बापरे! घरं गेली पाण्यात आणि मासे आले दारात, पाहा हा VIDEO

बापरे! घरं गेली पाण्यात आणि मासे आले दारात, पाहा हा VIDEO

पुरामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये पिकाचं आणि घरांचं नुकसान झालं इतकच नाही तर जनजीवन विस्कळीत झालं आहे.

    हैदराबाद, 21 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांना या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला. महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश इथली उभी राहिलेली पिकं तर जमीनदोस्त झालीच पण त्यासोबत मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं तर घरांची अवस्था तलावांसारखी झाली. नदीचं पात्राबाहेर पाणी वाढल्यानं नदीतील मगरी, साप आणि मासे देखील पुराच्या पाण्यासोबत रस्त्यावर घरांमध्ये आलं. दोन दिवसांपूर्वी मगर पाण्यातून घरात शिरल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता आणि त्यानंतर आता घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यासोबत मासे देखील आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. महाराष्ट्रात देखील डौलात उभं राहिलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटामुळे पाण्यात गेल्याचं दु:ख आहे. तेलंगणा राज्यात पूरस्थिती आल्यानंतर सरकारने पीडित कुटुंबांना 10 हजार रुपयांची रोख मदत देण्याचे जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात आलेल्या या आपत्तीनंतर हैदराबाद शहरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेश सरकारने मंगळवारी सांगितले की, राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला. तेलंगणाचे स्थानिक संस्था प्रशासन मंत्री के. टी. रामराव आणि इतर मंत्री व आमदारांनी शहरातील विविध भागातील पीडित कुटुंबांना 10-10 हजार रुपये दिले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल ही मदत योजना जाहीर केली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Hyderabad

    पुढील बातम्या