नवी दिल्ली, 8 डिसेंबर : एका पतीनं आपल्या पत्नीकडे (Husband and wife) बर्थडे गिफ्ट (Birthday gift) म्हणून अशी मागणी केली की पत्नीला काय करावं, तेच कळेना. आपल्या पार्टनरचा वाढदिवस हा प्रत्येकासाठी एक खास (Special day) दिवस असतो. या दिवशी काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, हा दिवस कसा साजरा करायचा यासारख्या गोष्टींचे प्लॅन (Birthday plans) कित्येक दिवस आधीपासून तयार होत असतात. काही गोष्टी पार्टनरसोबत ठरवल्या जातात, तर काही गोष्टी पार्टरनला न सांगता त्याला सरप्राईज दिलं जातं. अशा प्रसंगी पार्टनरलाही त्याची इच्छा विचारली जाते. मात्र एका पतीनं त्याच्या पत्नीकडं वाढदिवसाचं असं काही गिफ्ट मागितलं, की पत्नीच्या रागाचा पारा चढला.
पतीने केली अनोखी मागणी
लहानपणी प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं कमालीचं अप्रुप असतं. वाढदिवसाच्या कित्येक दिवस अगोदरपासून वाढदिवसाची तयारी व्यक्तीच्या मनात सुरू असते. मात्र व्यक्ती जसजशी मोठी होते, तसतसं हे अप्रुप कमी होत जातं आणि व्यक्ती जाहीरपणे वाढदिवस करणं कमी करते. वाढत्या वयात वाढदिवस ही एक वैयक्तिक बाब होते आणि माणसांना शांततेत आणि कमी गर्दीत वाढदिवस साजरा करणं आवडू लागतं. मात्र रेडिट.कॉमवर एका महिलेनं जेव्हा आपल्या पतीच्या मागण्या सांगितल्या, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
हे वाचा- काम करता करता चुकून बंद झालं Microsoft Word? असं रिकव्हर करा Document
पतीला हवीय सुट्टी
पतीनं आपला वाढदिवस एक दिवस साजरा न करता पूर्ण महिनाभर साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानं केलेल्या मागण्यांनुसार एक महिना पत्नीनं आपल्याला स्पेशल फिल करावं. या काळात आपल्याला कुठलंही घरगुती काम सांगू नये, काम सोडून आपल्याला कुठल्याही वेळी झोपता यावं, मुलांना शाळेला सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी देण्यात येऊ नये आणि हवं तेव्हा Xbox गेम खेळण्याची मुभा असावी, अशा मागण्या त्याने केल्या. या मागण्या ऐकून पत्नीच्या रागाचा पारा चांगलाच चढला आणि तिने या सर्वच्या सर्व मागण्यांना स्पष्ट नकार दिला. हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.