आपल्याला सोशल मीडियावर अनेकदा गमतीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील असे व्हिडीओ अल्पावधीत मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. या व्हिडीओमध्ये पती-पत्नीच्या (Husband Wife Funny Video) किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या व्हिडीओना सध्या विशेष पसंती मिळते आहे. काही व्हिडीओ इतके मजेशीर (Couple Funny Video) असतात की, हसून हसून वाट लागते. असाच एका पती-पत्नीचा (Husband Wife Viral Video) मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्राम रील्सवर (Instagram Reels Video) एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या पतीची पोलखोल (Husband caught cheating) करण्यासाठी पत्नीने लढवलेली शक्कल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पतीच्या फोनमध्ये डोकावण्यासाठी पत्नीने (Wife peeking in husband’s phone) केलेला जुगाड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हे वाचा-VIDEO - सुपरमार्केटमध्ये दबा धरून बसला होता भलामोठा अजगर; महिलेने डबा हटवताच...
काही बायका खूप संशयी वृत्तीच्या असतात. आपल्या पतीची हेरगिरी करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. तर, काही पतीदेखील बायकांच्या नजरेआड अशा काही गोष्टी करतात, ज्या त्यांनी खरं तर करू नयेत. सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात पतीपत्नी (Husband Wife Video) एका कोचवर झोपलेले आहेत. पत्नीने पतीच्या डोक्याच्या मागे असलेल्या भिंतीवर आपले पाय लावलेले आहेत. आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये तिने चक्क आयपॅड (iPad) पकडला आहे, ज्याचा कॅमेरा ऑन आहे.
हे वाचा-दारू पिऊन सैराट! अशी नाचली अशी नाचली तरुणी; डान्स पाहून तुम्हालाही चक्कर येईल
पत्नीकडे तोंड करून बसलेल्या पतीला याची कल्पनाच नाही की तो ज्या गोष्टी फोनमध्ये ब्राउज करतोय त्या तिला त्याच्या आयपॅडमध्ये स्पष्ट दिसतायंत. सुरुवातीला पती अधून-मधून पत्नीला आपल्या फोनमधील काही गोष्टी दाखवतो, जेणेकरून ती त्याच्यावर संशय घेणार नाही. मात्र, त्याला या गोष्टीचा अंदाजही नसतो की, त्याची हुशार बायको त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.
View this post on Instagram
सुरुवातीला काही काळ फोनवर इतर गोष्टी पाहिल्यानंतर पती काही मुलींचे फोटो पाहू लागतो. हे सर्व पत्नीला आयपॅडच्या कॅमेरामध्ये दिसतं. पतीची ही कामगिरी पाहून पत्नीचा पारा चढतो. त्यानंतर ती त्याची बेदम धुलाई करते, असा हा मजेशीर व्हिडीओ आहे. या व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये लोक पत्नीनं केलेल्या जुगाडची स्तुती करत आहेत. अशा युक्त्या करून बायका आपल्या नवऱ्यांवर लक्ष ठेवत असतात. या व्हिडीओतून इतर बायकांनाही काहीतरी नवी कल्पना सुचू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Video viral, Video Viral On Social Media, Videos viral, Viral