मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पत्नी परपुरुषाशी विवाह करतानाचा VIDEO पाहून पतीला धक्का; पोलिसांत केली तक्रार; फसवणूक करणाऱ्या टोळीचे कारनामे उघड

पत्नी परपुरुषाशी विवाह करतानाचा VIDEO पाहून पतीला धक्का; पोलिसांत केली तक्रार; फसवणूक करणाऱ्या टोळीचे कारनामे उघड

सोशल मीडियामुळे (Social Media) माणसांमधील संवाद प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे वाढला आहे. परंतु, यामुळे नात्यांमधील दुरावा, फसवणूक आदी घटनाही घडत आहेत.

सोशल मीडियामुळे (Social Media) माणसांमधील संवाद प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे वाढला आहे. परंतु, यामुळे नात्यांमधील दुरावा, फसवणूक आदी घटनाही घडत आहेत.

सोशल मीडियामुळे (Social Media) माणसांमधील संवाद प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे वाढला आहे. परंतु, यामुळे नात्यांमधील दुरावा, फसवणूक आदी घटनाही घडत आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 जून : सोशल मीडियामुळे (Social Media) माणसांमधील संवाद प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षपणे वाढला आहे. परंतु, यामुळे नात्यांमधील दुरावा, फसवणूक आदी घटनाही घडत आहेत. नात्यामधील फसवणुकीची एक घटना नुकतीच समोर आली. पती आपल्या आवडत्या व्हिडीओ अॅपवर व्हिडीओ पाहत असताना, एक व्हिडीओ पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओमध्ये या व्यक्तीची पत्नी नजीकच्या शहरातील एका व्यक्तीशी लग्न करत असल्याचे पाहताच क्षणभर निशब्द झाला. याबाबत अधिक माहिती घेतली असता आपल्याला विवाहाबाबत खोटे सांगून जाळ्यात ओढणाऱ्या टोळीने फसवले (Fraud) आहे, असे त्याच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांत तक्रार केली असता  फसवणूकीचे मोठे रॅकेट समोर आले आणि 19 खोटे विवाह तसेच फसवणूकीच्या गुन्ह्यात 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

ओडीटीसेंट्रलच्या वृत्तानुसार, 35 वर्षीय यीन चेंग (Yin Cheng) (नाव बदलले आहे) हा मंगोलियातील (Mongolia ) बायानूर शहरात राहतो. विवाहायोग्य वय झाल्याने त्याचे कुटुंबिय त्याला विवाह कर म्हणून सातत्याने सांगत होते. परंतु, विवाह ही गोष्ट सध्या चीनमध्ये सहज शक्य नाही. हे ओळखून यीन याने विवाह ठरवण्यासाठी ली नावाच्या मॅचमेकरची (Matchmaker) मदत घेतली. त्याने यीनची ओळख एका विवाहीत महिलेशी (नाना) करुन दिली. मात्र यामुळे यीनला काहीच फरक पडणार नव्हता. नानाशी बऱ्याच वेळा व्हिडीओ कॉलवरुन संवाद झाल्यानंतर व्यक्तिशः भेटण्यासाठी त्याने तिला बायानूरला येण्यास सांगितले. सर्व गोष्टींवर विश्वास बसावा यासाठी तिला 1000 युआन देखील पाठवले. या सर्व घडामोडी घडत असताना आपण एका मोठ्या घोटाळ्यात अडकून आपली फसवणूक होत आहे, याची पुसटशी कल्पना देखील यीनला आली नाही.

हे ही वाचा-कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी पतीची अफलातून शक्कल, पाहा VIDEO

जेव्हा यीनच्या वडिलांची नानाशी प्रथम भेट झाली, तेव्हा त्यांनी नानाच्या पालकांना लवकरात लवकर भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मॅचमेकरने यीनच्या वडिलांना थांबवत नाना दूर खेड्यात राहते, तिच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या पुलाचे काम सुरु आहे, त्यामुळे तिचे कुटुंबिय त्या कामामध्ये फार व्यस्त असतात आदी कारणे सांगितली. तिने देखील आम्हाला या बांधकामामुळे कंपनी सदस्य संख्येच्या आधारे नुकसानभरपाई देणार असल्याचं सांगितलं. परंतु , नुकसानभरपाईचा करारनामा होण्यापूर्वी नानाने कायदेशीररित्या विवाह केला तर तो करार संपुष्टात येईल, असे देखील नमूद करण्यात आलं. हे सर्व ऐकून यीनच्या कुटुंबियांनी पारंपारिक पध्दतीने विवाह करण्याचे मान्य केले तसेच नुकसानभरपाईची कामे होताच मोठा विवाह समारंभ आयोजित करण्याचं ठरलं. त्यानुसार यीन आणि नाना जानेवारीत विवाहबध्द झाले. यावेळी नानाला यीनकडून हुंडा (Dowry) म्हणून 148,000 येन (23,500 डॉलर्स), दागिने आणि भेटवस्तू मिळाल्या.

लग्नानंतर 3 दिवसांनी नानाने आपल्या नव्या पतीकडे मला माझ्या कुटुंबियांकडे परत जायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. यीनने तिची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर नाना आठवडाभराने यीनकडे परतली. पण मला माझ्या आईला मदत करायची आहे, असे सांगून ती दोन दिवसांनी परत माहेरी आली. हे सर्व घडत असताना यीनला फसवणूकीबाबत पुसटशी शंका देखील आली नाही, उलट आपल्या पत्नीला माहेरची आठवण येत असावी, म्हणून ती सारखी माहेरी जात असावी, असे वाटले.

परंतु, नानानं कॉल करणं थांबवलं, ती घराबाहेर जास्त काळ राहू लागल्यानंतर यानीला फसवणुकीबाबत काहीशी शंका येऊ लागली. मग मार्चमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली. यीन जेव्हा टिकटॉकचा (TikTok) प्रतिस्पर्धी कुईशौ(Kuaishou) हे व्हिडीओ अप पाहत होता. तेव्हा स्क्रोलिंग करताना तो सिक्सिओझा शहरातील एका लग्नाच्या व्हिडीओवर थांबला. या व्हिडीओत त्याला त्याच्या पत्नीसारखी दिसणारी एक महिला दिसली. त्याने निरखून पाहिलं असता ती नाना असल्याचं त्याच्या लक्षात आलं.  त्यानंतर यीनने नानाला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नानाने उत्तर दिले नाही. त्यामुळे यीनने आपल्या पत्नीने ज्या पुरुषाशी लग्न केले आहे, त्याला भेटण्याचा निर्णय घेतला आणि तो सिक्सिओझाला गेला. त्याने नानाच्या दुसऱ्या पतीची भेट घेऊन त्याला सर्व प्रकार सांगितला आणि व्हिडीओतील तुझी पत्नी ही माझी देखील पत्नी असल्याचे पुराव्यासह समजून सांगितले. ती नाना असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत नाना आणि ली हे मोठ्या स्कॅमर नेटवर्कमध्ये (Scammer Network) सहभागी असून, विवाह करु इच्छिणाऱ्या पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून हे दोघे त्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. पारंपरिक पध्दतीने विवाह करुन, हुंडा, भेटवस्तू घ्यायच्या आणि नंतर लग्न रद्द करुन कराराचे कागदपत्रं फाडून टाकायचे असा त्यांचा फसवणूकीचा प्रकार होता. पोलिसांनी 19 खोट्या विवाहाच्या प्रकरणात गुंतलेल्या आणि 2 दशलक्ष युआनची (314,000 डॉलर्स) फसवणूक केल्याचा आरोप ठेवत एकूण 5 जणांना अटक केली.

First published:

Tags: Marriage, Social media, Video