नवी दिल्ली, 28 मार्च : नवरा बायकोचं नातं खूप खास असतं. दोघेही एकमेकांचे आयुष्यभरासाठीचे साथीदार मानले जातात. मात्र हेच साथीदार कधी कधी एकमेकांची फसवणूक करतात. आजकाल तर अशा धोका आणि फसवणूकीच्या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे. नवरा किंवा बायकोपैकी कोणीतरी दुसऱ्याला धोका देतात. आपण विचारही करु शकत नाही अशा प्रकारे विचित्र आणि धक्कादायक घटना घडतात. अशातच आणखी एक घटना समोर आलीये ज्यामध्ये बायकोने आपल्या नवऱ्याला धोका दिला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
सध्या समोर आलेली घटना खूप धक्कादायक असून कोणत्याही नवऱ्याला हे वाचून धक्का बसेल. सनच्या वृत्तानुसार, एका महिलेने आपल्या पतीला रुग्णालयात एकटे सोडले, जेव्हा तो रुग्णालयात जीवन मरणाची लढाई लढत होता. पत्नी शांतपणे तेथून निघून घरी गेली आणि प्रियकरासोबत राहिली.
हेही वाचा - भल्यामोठ्या नागाला व्यक्तीने घातली अंघोळ, Video पाहून भरेल धडकी
महिलेच्या लग्नाला 10 वर्षे झाले होते. तिचा पती 40 वर्षांचा तर ती स्वतः 45 वर्षांची होती. एकदा महिलेच्या पतीच्या गाडीचा अपघात झाला ज्यामध्ये पतीला गंभीर दुखापत झाली. पत्नीला याची माहिती मिळताच तिने पतीला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सांगितली. पतीला भुलीचं इंजेक्शन देण्याअगोदर महिलेनं त्याचा निरोप घेतला आणि घरी निघून गेली. जेव्हा पती शुद्धीवर आला तेव्हा दोन दिवस महिला त्याला भेटण्यासाठी आलीच नाही. हे पाहून पतीला खूप वाईट वाटले. एवढंच नाहीतर तर त्याचे शेजारचे मित्रही त्याला भेटून गेले.
हेही वाचा - जॉबलेस ज्युसवाला! मित्रांनी मिळून सुरु केला नवा व्यवसाय, नावामागे दडलीय खास कहाणी
शेवटी व्यक्तीच्या शेजारील मित्रांनी त्याला सांगितले की, महिला घरीच असून मागील दोन दिवसांपासून यांच्या घरी कोणी व्यक्ती ये जा करत आहे. मित्राचे म्हणणे ऐकून पतीला खात्री पटली की पत्नी प्रियकरासह घरी आहे. यापूर्वीही त्यांना याबाबत शंका होती, त्याला या घटनेने पुष्टी दिली.
दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आली असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यापूर्वीही अशा धोक्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral, Women extramarital affair