• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • स्वत: पतीनेच कम्प्युटर इंजिनिअर पत्नीचं नाव नोंदवलं वधू-वर सूचक मंडळात; खुलाशानंतर सासरचेही चक्रावले

स्वत: पतीनेच कम्प्युटर इंजिनिअर पत्नीचं नाव नोंदवलं वधू-वर सूचक मंडळात; खुलाशानंतर सासरचेही चक्रावले

पती-पत्नी लग्नानंतर अमेरिकेत राहत होते.

 • Share this:
  तामिळनाडू, 22 ऑक्टोबर : घटस्फोट (Divorce) रखडल्यामुळे पतीने विनाकारण पत्नीवर राग काढून एका वधू-वर सूचक मंडळात (Matrimonial Center) तिचं नाव नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार तमिळनाडूतल्या (Tamilnadu) तिरुवल्लूर (Tiruvallur) जिल्ह्यात घडला आहे. पत्नीचं नाव वधू-वर सूचक केंद्रात नोंदवून त्याने तिच्याबद्दल चुकीची माहिती नोंदवली आणि तिच्या वडिलांचा नंबरही संपर्कासाठी त्यात दिला. मुलीविषयी चौकशी करणारे खूप फोन आल्यामुळे तिच्या वडिलांना काही समजेना. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला. त्यानंतर 34 वर्षांच्या ओमकुमारला अटक करण्यात आली आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या उलुंधाई गावातल्या पद्मनाभन (Padmanabhan) यांची मुलगी झांसी (32) आणि ओमकुमार (34) यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. झांसी कम्प्युटर इंजिनीअर आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यातलंच वेल्लीयूर हे ओमकुमारचं गाव. तो अमेरिकेत नोकरीला होता. त्याच्यानंतर झांसीलाही अमेरिकेत नोकरी मिळाली आणि पतीसोबत राहण्यासाठी तीही तिकडे गेली; मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये विसंवाद होत गेले, खटके उडू लागले. त्यानंतर ओमकुमार पत्नीला तिकडेच ठेवून आपल्या मूळ गावी परतला. या दाम्पत्याला चार वर्षांचा मुलगा असून, हे दाम्पत्य गेली साडेतीन वर्षं विभक्त राहत आहे. चेन्नईजवळच्या पूनामल्ली इथल्या फॅमिली कोर्टात ओमकुमारने घटस्फोटासाठी (Divorce) अर्जही केला; मात्र त्या अर्जावर अद्याप निकाल मिळाला नसल्याने त्यांचा घटस्फोट अद्याप झालेला नाही. दरम्यान, तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या एका लोकप्रिय वधू-वर सूचक मंडळात झांसीचं नाव नोंदवलं गेलं. ती लग्नास इच्छुक असल्याचं लिहून, तिच्या वडिलांचा फोन नंबर संपर्कासाठी देण्यात आला होता. मॅट्रिमोनियल प्रोफाइल पाहून झांसीबद्दल विचारणा करणारे अनेक कॉल्स पद्मनाभन यांना येऊ लागल्यावर ते चक्रावले. कारण त्यांनी कधीच कोणत्या वधू-वर सूचक केंद्रात आपल्या मुलीचं नाव नोंदवलं नव्हतं. हे ही वाचा-एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम सातत्याने येणाऱ्या कॉल्सना वैतागून त्यांनी अखेर तिरुवल्लूरमधल्या पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेत तक्रार नोंदवली. आपल्या मुलीचं प्रोफाइल कोणी नोंदवलं, याची चौकशी करण्याची आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तिरुवल्लूर सायबर क्राइम इन्स्पेक्टर लिली, सबइन्स्पेक्टर मनोज प्रभाकर दास यांनी FIR दाखल करून तपासाला सुरुवात केली. तपासात असं आढळलं, की घटस्फोटाला उशीर होत असल्यामुळे राग आल्याने झांसीचा पती ओमकुमार यानेच झांसीचं नाव वधू-वर सूचक मंडळात नोंदवलं होतं. पोलिसांनी ओमकुमारला अटक केली आणि तिरुवल्लूर जिल्हा कोर्टासमोर हजर केलं. त्यानंतर त्याला कोठडीत नेण्यात आलं.
  First published: