नवी दिल्ली, 20 जानेवारी : कधी कोणासोबत काय घडेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे आपल्यासोबत घडलेल्या गोष्टीसोबत नक्की डील कसं करायचं हे अनेकांना समजत नाही. कधी कधी या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींनाही सांगणं कठिण होऊन जातं. त्यामुळे बऱ्याचदा लोक एकमेकांपासून गोष्टी लपवतात किंवा सांगण्याचं टाळतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीपासून त्याची एक खूप महत्त्वाची गोष्ट लपवली. याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पहायला मिळते.
एका व्यक्तीला नोकरीवरुन काढण्यात आलं आणि त्याने ही गोष्ट आपल्या बायकोपासून महिनाभर लपवून ठेवली. हा व्यक्ती हॉंगकॉंगचा रहवासी असून तो 46 वर्षाचा आहे. गेल्या वर्षी त्याला नोकरीवरुन काढण्यात आल्यावर ही गोष्ट बायको आणि मुलांना सांगण्यासाठी तो घाबरत होता. नोकरीवरुन काढल्यामुळे तो धक्क्यात होता. तो रोज घरातून ऑफिसला जात आहे म्हणून बाहेर पडायचा आणि सायंकाळी घरी परतायतचा. त्याने नाटक महिनाभर केलं. कारण त्याला त्याची परिस्थीती बायको मुलांना सांगण्याची भीती वाटत होती.
हेही वाचा - जागातलं सर्वात महाग सँडवीच, किंमत ऐकून भूक मरेल... असं नेमकं काय आहे यात?
त्या व्यक्तीने अलीकडेच ऑफिस डेली नावाच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहून आपली परिस्थिची शेअर केली. त्याने सांगितले की त्याने हाँगकाँगमधील अनेक जॉब वेबसाइट्ससाठी मुलाखत दिली मात्र त्याचं सिलेक्शन झालं नाही. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर मी तीन आठवड्यांसाठी रजेवर असल्याचं घरी सांगितलं. आणि त्यांनंतर काही दिवस नोकरीवर जाण्याचं नाटक केलं. नोकरीशिवाय हे नाटक फार काळ सुरु ठेवता येणार नाही. ही पोस्ट नक्की कोणत्या व्यक्तीने केली होती हे अद्याप कळू शकलं नाही मात्र ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, अनेकवेळा आपल्यासोबत अशा अनपेक्षित अचानकपणे अनेक गोष्टी घडतात. फक्त नोकरीच नाही तर खाजगी आयुष्यातही आपण बऱ्याच अडचणींना तोंड देत असतो. बऱ्याच वेळा आपले पेशन्सही संपतात आणि कोणाशी बोलावं कोणाला सांगावं हेही समजत नाही. असाच काहीसा प्रकार या हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडल्याचं पहायला मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Top trending, Viral, Viral news