मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला 1 किलोचा सोन्याचा हार भेट? जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य

लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला 1 किलोचा सोन्याचा हार भेट? जाणून घ्या VIRAL VIDEO चं सत्य

Viral Video Facts: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत लांब सोन्याचा हार परिधान केला आहे. जाणून घ्या या व्हिडीओमागचं गौडबंगाल...

Viral Video Facts: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत लांब सोन्याचा हार परिधान केला आहे. जाणून घ्या या व्हिडीओमागचं गौडबंगाल...

Viral Video Facts: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत लांब सोन्याचा हार परिधान केला आहे. जाणून घ्या या व्हिडीओमागचं गौडबंगाल...

मुंबई, 23 मे: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत लांब सोन्याचा हार परिधान केला आहे, तर तिचा नवरा तिच्यासाठी गाणं गात आहे. संबंधित महिलेनं परिधान केलेला हार तब्बल एक किलोचा असल्याचा ( 1 kg gold necklace) दावा सोशल मीडियात अनेक युजर्स करत आहे. सोन्याचे दर गगनाला भिडत असताना संबंधित व्यक्तीनं 1 किलो सोन्याचा हार खरंच आपल्या पत्नीला भेट दिला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण संबंधित हार बाबतचा खुलासा व्हिडीओमधील व्यक्तीनं स्वतः केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. अनेकजण हा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही फॉरवर्ड करत आहेत. या व्हिडीओत एक दाम्पत्य पाहायाला मिळत आहे. जे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. या व्हिडीओतील महिलेनं गुडघ्यापर्यंत लांब असणारा एक सोन्याचा हार परिधान केला. हा हार पतीनं लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून पत्नीला दिल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. तर नवरा ‘प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जमाना’ हे ‘मुद्दत’ चित्रपटातलं गाणं आपल्या पत्नीसाठी गाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ कल्याणमधील कोनगावचे रहिवासी असणाऱ्या बाळू कोळी यांचा आहे. त्यांच्या पत्नीनं हा हार घातला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून पोलिसांनी देखील बाळू कोणी यांना पोलीस स्थानकात बोलावून घेतलं होतं. सध्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एवढा महागडा हार घालून सोशल मीडियावर प्रदर्शन करून नका चोरी होऊ शकतो, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला. पण बाळू कोळी यांनी या हारबाबत खुलासा केल्यानंतर पोलिसही चक्रावले आहेत.

हे ही वाचा-हर एक फ्रेंड...! लग्नात टॉयलेट क्लीनर अन् ब्रश कोण गिफ्ट करतं? वधूवर हताश; VIDEO

मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित हार खरा नसून खोटा असल्याचं स्वतः बाळू कोळी यांनी पोलिसांना सांगितलं आहे. “संबंधित हार आपण बऱ्याच वर्षांपूर्वी घेतला होता असून त्याची किंमत 38 हजार रुपये असल्याची माहिती कोळी यांनी यावेळी दिली आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित हाराची एका ज्वेलरकडून तपासणी करुन घेतली आहे. तो हार नकली असल्याची पुष्टी ज्वेलरनं केली आहे.

First published:

Tags: Viral video.