मराठी बातम्या /बातम्या /Viral /पत्नीच्या त्या सवयीला कंटाळला; पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं 2 मुलांच्या आईचं लग्न

पत्नीच्या त्या सवयीला कंटाळला; पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं 2 मुलांच्या आईचं लग्न

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

व्हिडिओमध्ये गावकरी प्रेमी युगुलाला मारहाण करताना दिसत आहेत. मग पंचायत बोलावली जाते आणि यानंतर दोघेही लग्न करतात.

  • Local18
  • Last Updated :
  • Jharkhand, India

रांची 11 मार्च : प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. झारखंडच्या पाकूरमध्ये एका प्रेमी युगुलाला खांबाला बांधून मारहाण केली गेली. यानंतर त्यांचं लग्न लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गावकरी प्रेमी युगुलाला मारहाण करताना दिसत आहेत. मग पंचायत बोलावली जाते आणि यानंतर दोघेही लग्न करतात.

'या'मुळे नवरी-नवरदेवाकडील लोक आपसातच भिडले; हाणामारीत अनेकजण जखमी, शेवटी पोलिसांनीच लावलं लग्न

या घटनेत हिरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मुलांची आई असलेली एक महिला गावातीलच एका तरुणावर प्रेम करत होती. दोघेही गुपचूप भेटत असत. दोघांच्या प्रेमाची संपूर्ण गावाला माहिती होती. यासंदर्भात गावात पंचायतही बसली होती. पण दोघेही मान्य करायला तयार नव्हते. भेटणं आणि फोनवर बोलणं असा प्रकार सुरू होता. गुरुवारी संधी मिळताच महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं. पण या दरम्यान लोकांना याची माहिती मिळाली. यानंतर दोघांना घरात रंगेहाथ पकडण्यात आलं.

खांबाला बांधून केली मारहाण

गावकऱ्यांनी दोघांनाही खांबाला बांधून बेदम मारहाण केली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर पोलीसही आले. त्यानंतर गावात पंचायत झाली, ज्यामध्ये महिलेच्या पतीच्या संमतीने दोघांचं लग्न लावण्याचं ठरलं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. ही महिला पतीच्या घरातून प्रियकराच्या घरी गेली. तर तिची मुलं वडिलांसोबत राहतात.

या संदर्भात हिरणपूर पोलीस ठाण्याचे एसआय बिरसा तुती यांनी सांगितलं की, प्रेमी युगुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर गावच्या पंचायतीमार्फत दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. यासाठी महिलेच्या पतीनेही संमती दिली.

First published:
top videos

    Tags: Love story, Marriage