• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लव्ह मॅरेजनंतर पत्नीचा सोबत राहण्यास नकार; खरं कारण समोर येताच हादरला पती

लव्ह मॅरेजनंतर पत्नीचा सोबत राहण्यास नकार; खरं कारण समोर येताच हादरला पती

लव्ह मॅरेजनंतर (Love Marriage) 10 महिन्यांनी त्याच्या पत्नीला (Wife) काय झालं याची त्याला काहीही कल्पना नव्हती. मात्र, तिनं त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.

 • Share this:
  लखनऊ 24 जुलै : एका युवकाला प्रेमात मोठा धोका मिळाला आहे. या युवकानं पोलिसांत (Police) धाव घेत सांगितलं, की लव्ह मॅरेजनंतर (Love Marriage) 10 महिन्यांनी त्याच्या पत्नीला (Wife) काय झालं याची त्याला काहीही कल्पना नव्हती. मात्र, तिनं त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. पत्नी आपल्या आईसोबत घरातून पैसे आणि दागिने घेऊन निघून गेली. आता तिनं दुसऱ्यासोबत लग्नगाठ (Marriage) बांधली आहे. ही घटना पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडिओ (Wedding Video) समोर आल्यानंतर उघड झाली. पीडित युवक पत्नीचा हा व्हिडिओ घेऊन पोलिसांकडे गेला. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. कानपूरच्या (Kanpur) बाबूपुरवा येथील रहिवासी अमित शर्मा यानं सांगितलं, की गोविंद नगरमध्ये राहाणाऱ्या रुचि वर्मा हिच्यासोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनी 4 जून 2020 रोजी आर्यसमाज मंदिरात घरच्यांच्या परवानगीनं लग्न केलं. कोरोनाकाळात झालेल्या या लग्नातील केवळ घरातीलच लोक उपस्थित होते. त्याच्याकडे या लग्नाचं सर्टिफिकेटही आहे. Bungee Jumping ची हौस जीवावर बेतली; एक चूक अन् हवेतच झाला तरुणीचा मृत्यू अमितनं सांगितलं, की लग्नानंतर ते दोघंही आनंदात जगत होते. मात्र, लग्नाच्या चार महिन्यानंतर 23 सप्टेंबरला मुलीची आई घरी आली. तिनं सांगितलं, की एका नातेवाईकाचं लग्न आहे आणि याच बहाण्यानं ती रुचिला आपल्यासोबत घेऊन गेली. रुचि आपल्यासोबत 50 हजार रुपये आणि दागिनेही घेऊन गेली. माहेरी गेल्यानंतर काही दिवसांनी पतीनं जेव्हा रुचिला फोन केला तेव्हा तिचा फोन बंद होता. यानंतर तो आपल्या पत्नीला घेण्यासाठी थेट तिच्या घरी गेला, मात्र पत्नीनं त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. बराच वेळ त्यानं समजावूनही रूचि सासरी परत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे, पतीनं याप्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. यात हैराण करणारं सत्य समोर आलं. अमितनं सांगितलं, की तीन दिवसाआधीच त्याला अशी माहिती मिळाली, की घटस्फोटही न घेताच रुचिनं दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली आहे. सुरुवातीला अमितला या गोष्टीवर विश्वास बसला नाही. मात्र, अधिक माहिती मिळवण्यासाठी तो रतनलाल नगरमधील आर्यसमाज मंदिरात पोहोचला आणि इथेच त्याला आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. VIDEO: अरे हे काय! लग्नासाठीही सुट्टी नाही; मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding पीडित पतीनं पोलिसांनी सांगितलं, की त्याच्या पत्नीनं 2 जुलै 2021 रोजी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यानं आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर धोका दिल्याचा आरोप करत पोलिसांत मदत मागितली. अमितचं असं म्हणणं आहे, की त्याच्या पत्नीनं आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. याप्रकरणी बोलताना पोलिसांनी सांगितलं, की पतीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास केला जात आहे. आठ महिन्यांपूर्वीही पती आणि पत्नी यांच्यातील वाद ठाण्यात पोहोचला होता. तेव्हा दोघांनाही समजवण्यात आलं होतं आणि महिला आपल्या आईसोबत गेली होती. आता पतीनं घटस्फोट न घेताच लग्न केल्याचा आणि घरातील पैसे घेऊन गेल्याचा आरोप या महिलेवर केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: