मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डिलिव्हरीवेळी माझा भाऊ तुझ्यासोबत थांबणार; गरोदर पत्नीकडे पतीची विचित्र मागणी, सांगितलं अजब कारण

डिलिव्हरीवेळी माझा भाऊ तुझ्यासोबत थांबणार; गरोदर पत्नीकडे पतीची विचित्र मागणी, सांगितलं अजब कारण

सोशल मीडिया साईट रेडिटवर एका महिलेनं नुकतंच आपल्या पतीबाबत जे काही सांगितलं ते हैराण करणारं आहे. महिलेनं सांगितलं की ती 31 आठवड्यांची गरोदर आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : कोणत्याही महिलेसाठी आपल्या बाळाला जन्म देणं, हा अतिशय आनंदाचा क्षण असतो. मात्र लेबर पेन अतिशय वेदनादायी असतं, ज्याचा अंदाज पुरुष कधीच लावू शकत नाहीत. लेबर पेन सहन करणं एखाद्या पुरुषाला शक्यही नाही. मात्र अशात जर एखाद्या पुरुषाने पत्नीच्या या वेदनांप्रती सहानुभूतीही दाखवली नाही तर निश्चितच कोणीही महिला भडकेल. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं (Weird Demand of Pregnant Woman’s Husband) . तो हट्ट करू लागला की जेव्हा त्याची पत्नी लेबर रूममध्ये बाळाला जन्म देत असेल तेव्हा त्याचा भाऊ लेबर रूममध्येच थांबेल (Brother in Law in the Labor Room).

सोशल मीडिया साईट रेडिटवर एका महिलेनं नुकतंच आपल्या पतीबाबत जे काही सांगितलं ते हैराण करणारं आहे. महिलेनं सांगितलं की ती 31 आठवड्यांची गरोदर आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. मात्र तिचा पती हट्ट करू लागला आहे. महिलेनं सांगितलं की तिच्या पतीची अशी इच्छा की जेव्हा पत्नी बाळाला जन्म देईल तेव्हा त्याचा भाऊही डिलिव्हरी रूममध्ये (Delivery Room) असावा.

महिलेनं सांगितलं की ती आणि तिचा पती दोघंही 21 वर्षाचे आहेत आणि एका वर्षापासून ते बाळासाठी प्लॅन करत होते. नुकतंच महिलेला समजलं की ती जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. ती पतीच्या घरच्यांना लहानपणीपासूनच ओळखत त्यामुळे त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. पतीचा भाऊ २४ वर्षाचा असून तो मेडिकलचा विद्यार्थी आहे. महिलेचं त्याच्यासोबतही चांगलं बॉन्डिंग आहे. मेडिकल स्टूडंट असल्यामुळेच त्याला लेबर रूममध्ये थांबायचं आहे.

महिलेनं सांगितलं की हे ऐकताच आधी तिने नकार दिला की तिच्या पतीचा भाऊ लेबर रूममध्ये येणार आहे. महिलेनं म्हटलं की तिला आपल्या पतीसमोरच लाज वाटेल. अशात तिथे पतीचा भाऊही उपस्थित असल्यास तिला आणखीच वाईट वाटेल. सोशल मीडियावर अनेकांनी महिलेला सपोर्ट केला आहे. एकाने म्हटलं की महिलेनं अशा व्यक्तीला घटस्फोट द्यायला हवा, जो अशा वेळेतही तिच्यावप दबाव आणत आहे.

First published:

Tags: Pregnant woman, Shocking news